आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कल्पना सत्यात उतरवण्याचा फॉर्म्युला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेसबुक विषयी विचार करताच मार्क झुकेरबर्ग डोळ्यासमोर येतात. फेसबुक लाँच झाल्यावर काही दिवसांनीच हार्वर्ड विद्यापीठातील दोन बंधूंनी त्यांच्यावर खटला दाखल केला होता. विंकलवॉस ट्विन्सचा झुकेरबर्ग यांच्यावर आरोप होता की, कनेक्टिव्ह साइटवर काम करताना झुकेरबर्ग यांनी त्यांची कल्पना चोरली होती. मोठ्या यशस्वी कामगिरींच्या इतिहासात डोकावून पाहिले असता त्यात कल्पना चोरी करण्याचे अनेक किस्से दिसून येतात. याच आठवड्यात जीआय जो चित्रपटाच्या दोन लेखकांनी पॅरामाउंट आणि एमजीएमवर खटला दाखल केला आहे. चित्रपटाचे सिक्वेल बनवण्यासाठी स्टुडिओने त्यांची कल्पना चोरल्याचा त्यांचा आरोप आहे. मात्र, जोपर्यंत एखाद्या कल्पनेवर प्रत्यक्ष काम होत नाही, तोपर्यंत ती कल्पना व्यर्थ असते, हेच सत्य आहे. वहीत लिहिलेल्या किंवा अ‍ॅपमध्ये ठेवलेल्या उत्कृष्ट कल्पनांवर जोपर्यंत काम होत नाही, तोपर्यंत त्या अर्थहीन असतात. मोठे बदल घडवून आणण्यासाठी तसेच कल्पना सत्यात उतरवण्यासाठी वर्तमानातील क्षण सर्वात महत्त्वाचा असतो.
एखादी चांगली कल्पना सत्यात उतरवण्यापासून रोखणा-या नेमक्या कोणत्या गोष्टी असतात? यावर विचार करताना काही सामान्य अडथळे समोर येतात.


अडथळे
अपयशाची भीती - अपयशाचा विचार केल्यास आपण काही गोष्टी करायला घाबरतो. भीती असतानाही कल्पनेवर काम करणा-या लोकांना अशा मन:स्थितीत काम करण्याचा अनुभव येतो.
योग्य कल्पना निवडा- अनेकदा खूप कल्पना असल्या तर चांगल्या कल्पनांची निवड करणे खूप कठीण असते. ही कल्पना का राबवायची, हेसुद्धा माहीत असणे आवश्यक आहे. ही कल्पना तुम्हाला का आवडली हेसुद्धा माहीत असावे.
सिस्टिम तयार करा- चांगल्या कल्पना येण्यासाठी सृजनात्मकता हवी. चांगल्या कल्पना सत्यात उतरवण्यासाठी त्यावर प्रक्रिया सुरू करा.


उपाय
कल्पना निश्चित करा - कल्पना धारदार बनवा. ‘मला ऑनलाइन व्यापार सुरू करायचा आहे’ आणि ‘मला विद्यार्थ्यांसाठी विंटेज कपड्यांचा ऑनलाइन व्यापार सुरू करायचा आहे’ यात खूप फरक आहे.
परिणाम मिळवण्यासाठी काय केले पाहिजे - निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी धोरण तयार करा. व्यवस्था तयार केल्यास कल्पना सत्यात उतरवणे सोपे जाईल. त्यातून समस्यांचे निराकरण केले जाऊ शकते.
सुरुवात कशापासून करायला हवी? मोठी अपेक्षा केल्यास लवकर ध्येय गाठता येणार नाही. छोटे टप्पे केल्यास, ते गाठणे सोपे जाईल. एक टप्पा गाठल्यानंतर पुढचे पाऊल उचला.