आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: का पवि‍त्र मानला जातो रमजान महिना..!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लाम धर्मात पवित्र 'रमजान'ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यात अल्लाहची विशेष इबादत (उपासना) केली जाते. मुस्लिम बांधवांकडून निरंकार रोजे (उपवास) पाळले जातात. रोजाबरोबरच नमाज, कुराण पठण, विशेष प्रार्थना आदींमार्फत परमेश्वराची इबादत केली जाते. रमजानमध्ये एक रात्र 'शके कद्र' आहे. त्यात पवित्र कुराणचे अवतरण झाले आहे. त्यामुळेच 'रमजान'ला मांगल्याचेही प्रतिक मानले जात असल्याचे औरंगाबाद येथील दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक मोहम्मद उस्मान राही यांनी 'दिव्य मराठी ऑनलाइन'शी बोलताना सांगितले.

रमजान महिन्याचा पहिला दशक 'कृपेचा', दुसरा दशक 'क्षमेचा', तिसरा आणि अंतिम दशक नरकापासून 'मुक्ततेचा' मानला जातो. या काळात अल्लाह त्यास क्षमादान देईल व नरकापासून सुटका करून मुक्ती देईल. त्यामुळे वर्षभरातील अन्य अकरा महिन्यांत मिळणार्‍या नेकी (पुण्याई) पेक्षा रमजानमध्ये मिळणारी नेकी ही ही तब्बल सत्तर पटीने जास्त असते. त्यामुळे मुस्लिम बांधव जास्तीतजास्त नेकी कमाविण्यासाठी पवित्र रमजान महिन्यात संसार, व्यापार आदींचा त्याग करून अल्लाहस शरण जातात.

पुढील स्लाइडमध्ये वाचा.. 'रमजान' मांगल्याचे प्रतिक...