आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Important Decision May Let Give Responsibility On Team

महत्त्वाचे निर्णय घेण्याची जबाबदारी टीमवरही सोपवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कंपनीने यशस्वितेसाठी टीमला आदेशांवर काम करण्याऐवजी स्वत:ला महत्त्वाचे निर्णय घेण्यास तयार करा. हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू मधील याविषयीचे हे विश्लेषण.
आवड सांगा
चांगला पर्याय मिळवा

नोकरीचा शोध असेल तर नेटवर्क फायदेशीर ठरू शकते. योग्य व्यक्तींशी नेटवर्क नसेल तर ते वाढवले पाहिजे. नेटवर्कमुळे जे लोक तुम्हाला योग्य प्रकारे ओळखत नाहीत तेदेखील मदतीचा हात पुढे करू शकतात. त्यासाठी आपले व्यावसायिक हेतू स्पष्टपणे सांगा. स्वत:विषयी योग्य माहिती द्या. सोशल नेटवर्कवरील ओळख दाखवा. यातून लोक तुम्हाला नोकरी देऊ करतील. अशा संपर्कातून तुम्हाला सल्ला मिळू शकतो. अशा सल्ल्याच्या भडिमाराला घाबरून जाऊ नका. खासगी माहिती द्या आणि आपली आवड कशात आहे व समोरच्या व्यक्तीने तुम्हाला उत्तर का द्यावे हेदेखील सांगा.
(स्रोत-हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू ‘मेक अ स्ट्रेंजर बिलिव्ह इन यू’)
यशस्वी होण्यासाठी महत्त्वाच्या चार गोष्टी ..
टीम छोटी आहे की मोठी या गोष्टीचा काहीही परिणाम होत नाही. नेतृत्व करताना एक ग्रुप तयार करणे तुमचे काम आहे. सामान्यपणे टीम आदेशांचे पालन करते हे लक्षात ठेवा. आदेशांचे पालन नव्हे, तर टीमने स्वत:च्या पातळीवर काम करून यशस्वी होण्यात आपले खरे यश आहे. दुसरी गोष्ट म्हणजे टीममध्ये उद्दिष्टपूर्तीसाठी झटण्याची जिद्द निर्माण करणे आपली जबाबदारी आहे. तिसरे म्हणजे कोण, काय काम करत आहे याची तुम्हाला माहिती हवी. त्याचबरोबर कशा प्रकारे आपण निर्णय घेता आणि त्यात बदल करता हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.
(स्रोत- हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू ‘गाइट टू मॅनेजिंग अप अँड एक्रॉस)
टीमविषयी कोणतेही पूर्वग्रह ठेवू नका
लीडर म्हणून काम करताना सहका-यांना कामाविषयी जबाबदार बनवणे आपले काम आहे. त्याचबरोबर सोबत काम करणा-यांना कशी क्षमा करावी हेदेखील माहीत असले पाहिजे. अगोदरच्या चुकांबद्दल माफ केल्याने आपली संस्था अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकेल. जे सहकारी टीममध्ये चांगले काम करू शकले नाहीत त्यांच्याविषयी चुकीची धारणा बाळगू नये. सहका-यांच्या कमकुवतपणाचा परिणाम म्हणण्यापेक्षा चुकीतून सुधारण्याचा सल्ला द्या. संताप आणि आरोप लावणे हे काही कामाचे नाही. सहका-यांना संधी देत राहिल्याने स्वत:ला चांगले म्हणून सिद्ध करता येते.
(स्रोत - हार्वर्ड बिझेनेस रिव्ह्यू ‘ग्रेट लीडर्स नो व्हेन टू फर्गिव्ह’ कँटर )
सतत अपशब्द वापरणारे खोटारडे
खोटे बोलणा-या लोकांना पाचपट अयोग्य शब्दांचा वापर करण्याची सवय असते. जे लोक खरे बोलतात त्यांच्या तुलनेत खोटे बोलणारे तिस-या व्यक्तीविषयी अपशब्दांचा अधिक वापर करतात. विस्कॉन्सिन विद्यापीठाचे एम. वेन स्वाल, मायकल टी ब्राऊन आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलचे दीपक मल्होत्रा यांनी हा अहवाल तयार केला आहे. जे ज्ञान, ऊर्जा खोटे बोलण्यात लागते त्यात योग्य शब्दांची निवड केली जात नाही. तेव्हा त्यात ‘ते ’, ‘त्यांचे ’ यासारख्या शब्दांचा वापर स्वत:ला खोटेपणापासून वाचवण्यासाठी केला जातो.
(स्रोत- डिस्कोर्स प्रोसेसेस)
स्वनियंत्रणातून
चिडचिड वाढते

16 टक्के लोक जे चॉकलेट खाल्ल्यानंतर सफरचंद खाणे पसंत करतात ते ‘अँगर मॅनेजमेंट’, ‘हॅमलेट’सारखे राग दाखवणारे चित्रपट पाहतात. नॉर्थवेस्ट युनिव्हर्सिटीच्या कॅलॉग स्कूलचे डेव्हिड गेल आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या वेंडी लियू यांनी यासंदर्भात एक अहवाल तयार केला आहे. आनंदाचा भाव नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला तर लगेच संताप निर्माण होऊ शकतो. सदर अहवाल आणि अन्य एका प्रयोगातून ही गोष्ट सिद्ध झाली आहे. अर्थात स्वनियंत्रणातून चिडचिड आणखी वाढू शकते, असाही निष्कर्ष काढला जाऊ शकतो.
(स्रोत- जर्नल ऑफ कंझ्युमर रिसर्च)
बनावट उत्पादनाने
प्रतिमेचे नुकसान

71 टक्के बनावट उत्पादनाने प्रतिमा वाईट बनते. यासंबंधी एका प्रयोगशाळेत प्रयोग करण्यात आला. ज्या महिलांनी नकली डिझायनर सन ग्लासेस घातले होते त्यांनी पैसा कमावण्यातही फसवणूक केली. फ्रान्सेस्का जिनो व मायकल नॉर्टर्न यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलसाठी हा खुलासा केला आहे. या प्रयोगात ड्यूक विद्यापीठाच्या वतीने जेन एरिलेदेखील सहभागी झाले होते. बनावट उत्पादनामुळे तुमचे नुकसान होऊ शकते, असे या प्रयोगातून स्पष्ट
झाले आहे.
(स्रोत- सायकॉलॉजिकल सायन्स)