आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एका क्लिकवर पाहा, अातापर्यंतची सर्वात प्रभावशाली छायाचित्रे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टाइम मॅगझीनने जग बदलणाऱ्या काही अद्वितीय छायाचित्रांचा शाेध घेतला. या कामासाठी त्यांनी वेगळा ठसा उमटवणाऱ्या १०० छायाचित्रकारांची यादी बनवली. फाेटाेग्राफी महान अाहे अाणि त्यात सातत्याने बदल हाेत अाहे. यामुळे प्रभावशाली फाेटाेंची निवड फाेटाेचे महत्त्व अाणि त्याला काढल्याची पद्धत याच्या अाधारावर केले गेले. येथे काही असे फाेटाे प्रसिद्ध करत अाहाेत, ज्यामुळे अापल्या जगण्याची पद्धत बदलली. अनेक नवीन मार्ग उघडले. साेबत वाचा, ही छायाचित्रे कॅमेऱ्यात कैद करण्याची अद‌्भूत कथा.
खूप कमी असे पोर्ट्रेट कॅमेऱ्यात बंद झाले
छायाचित्रकार फिलिप हाल्समॅन यांची अाेळख अापल्या फाेटाेला जिवंत बनवणाऱ्यांमध्ये अाहे. यामुळे जेव्हा हाल्समॅनने अापले मित्र व जगविख्यात पेंटर सल्वाडोर डाली यांची पेंटिंग कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याचा विचार केला तेव्हा त्यांना माहित हाेते की, सामान्य पोर्ट्रेटमुळे हे काम हाेणार नाही. डालीची पेंटिंग लेडा एटोमिकामुळे प्रेरित होऊन हाल्समॅन यांनी आर्टिस्टच्या जवळपास मूळ पेंटिंगसारखे दृश्य तयार केले. पेंटिंगमध्ये एक उडणारी खुर्ची अाणि पातळ ताऱ्यांमध्ये लटकलेले कॅन्व्हस दाखवले. हाल्समॅनची पत्नी, मुलगीसह अनेक असिस्टेंट फोटो फ्रेमच्या बाहेर उभे हाेते. फाेटाेग्राफरची गणना पूर्ण हाेताच त्यांनी तीन मांजर हवेत फेकले. एक बादली पाणी अाणि फांदी फेकली. तब्बल २६ टेक घेतल्यावर हाल्समॅन अापल्या फाेटाेवर समाधानी झाले. हाल्समॅन यांची पहिली पोर्ट्रेट फोटोग्राफी अस्वाभाविक होती. फोटोग्राफर व संबंधित व्यक्तीदरम्यान ताळमेळ समजून येते. हाल्समॅन यांच्या अॅप्राेचमुळे अल्बर्ट आइंस्टीन, मर्लिन मनरो व अल्फ्रेड हिचकॉकसारख्या हस्तीचे फाेटाे काढले.
पुढे पहा,
अामच्या जगाचे सौंदर्य अन‌् जिवंत रंग
बातम्या आणखी आहेत...