Home »Divya Marathi Special» In Winter,Liar Speaking

थंडीतच नव्हे,खोटे बोलल्यावरही येतो अंगावर शहारा

दिव्य मराठी नेटवर्क | Jan 10, 2013, 00:00 AM IST

  • थंडीतच नव्हे,खोटे बोलल्यावरही येतो अंगावर शहारा


थंडी वाजल्यावर त्वचेवर शहारे येतात; पण या शहा-या च्या मदतीने एखाद्या व्यक्तीच्या मनातील हावभावही ओळखता येतात. एखादी व्यक्ती खोटे बोलत असल्यास तिच्या अंगावरील शहा-या द्वारे खोटे सहजपणे पकडता येऊ शकते.

एखाद्या व्यक्तीच्या अंगावर काटा येणे किंवा शहारा येणे हे भय, आनंद किंवा आश्चर्यकारक भावनांचे प्रतीक असते, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. एखादी व्यक्ती मनातील भाव लपवण्याचा प्रयत्न करत असली तरी त्वचेवरील शहा-या मुळे ते लपवता येत नाहीत. युनिव्हर्सिटी ऑफ कँटकीमधील प्राध्यापक रिचर्ड स्मिथ म्हणतात की, ‘आपल्याला वाटते की फक्त थंडी किंवा भीतिदायक वातावरणातच शहारे येतात; पण भीतीसोबतच आश्चर्य वाटणे किंवा एखाद्याचे कौतुकास्पद काम पाहूनही त्वचेवर शहारे येतात.अमेरिकेच्या महाविद्यालयांतील काही स्वयंसेवकांच्या मदतीने हे संशोधन करण्यात आले. आठवडाभरात त्वचेवर येणा-या शहा-या ची नोंद आणि मनातील भावांचे स्पष्टीकरण त्यांनी लिहून काढले. या सर्वांनी आठवड्यातून एकदा त्वचेवर शहारा आल्याचे अनुभवले. तसेच बहुतांश वेळा थंडी वाजल्यावर शहारा आल्याचे दिसून आले. शहारा येण्याचे दुसरे मोठे कारण म्हणजे आश्चर्य आणि आनंद असल्याचे नोंद करण्यात आले. एखादे उत्कृष्ट सादरीकरण पाहिल्यानंतरही अंगावर शहारे येण्याची अनुभूती झाली. तसेच एखाद्या चांगल्या प्रकल्पात सहभागी झाल्यावर किंवा मधुर संगीत ऐकतानाही शहारा आल्याचे दिसून आले.

या संशोधनात काही धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. जसे की, स्वत: केलेल्या कामांमुळे सर्वात कमी वेळेस अंगावर शहारे आले. प्राध्यापक स्मिथ यांच्या मते, हा सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष आहे. एखादी अद्भुत गोष्ट पाहिल्यावरच अंगावर काटा येतो; पण आपण केलेले काम हे नेहमी अद्भुत, वैशिष्ट्यपूर्ण नसून आपल्यासाठी ते सामान्यच असते. स्मिथ यांच्या मते, त्वचेवरील शहारे सामाजिक असतात. एखाद्या व्यक्तीच्या सादरीकरणामुळे अंगावर शहारे उभे राहतात. एखाद्याचे उद्बोधक भाषण तुमच्या त्वचेवर शहारे आणते. त्यामुळे एखाद्याची स्तुती करायची असल्यास यापेक्षा चांगला पर्याय असूच शकत नाही. किंवा एखाद्या सादरीकरणाचा प्रभाव तुम्हाला लपवायचा असला तरीही त्वचेवरील शहारे तुम्हाला खोटे ठरवू शकतात.

telegraph.co.uk

Next Article

Recommended