आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्पादकता वाढवणारे अद्भुत परंतु फायदेशीर उपाय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहा वर्षांपूर्वी स्टॅनफोर्डचे प्राध्यापक रॉबर्ट आय. सुटॉन यांनी सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी व्हिएर्ड रुल्सवर (अद्भुत नियम) एक पुस्तक लिहिले. आजकाल कंपन्या उत्पादकता वाढवण्यासाठी या अद्भुत नियमांचा अंगीकार करू लागल्या आहेत. उदाहरणच द्यायचे तर गुगलचा 20 टक्क्यांचा फॉर्म्युला सुटॉनच्या प्रस्तावाचाच एक भाग आहे. त्यानुसार गुगलमध्ये काम करणारे अभियंते कार्यालयात देत असलेल्या वेळापैकी 20 टक्के वेळ सृजनशील कामात खर्ची घालतात. त्यामुळे त्यांची उत्पादकता वाढत आहे. असेच हे काही अद्भुत नियम...
नियम-1 यश-निष्क्रियतेचा नव्हे, अपयशाचा स्वीकार करा : सुटॉनच्या मते, काम करण्याची पद्धती पाहून कर्मचा-या चा परफॉर्मन्स जोखता येतो. कोणत्याही कामात यशस्वी किंवा अपयशी होणा-या लोकांची प्रशंसा करा. त्यांचे समर्थन करा तर प्रत्येकच कामात निष्क्रिय लोकांना शिक्षा द्या.
नियम-2 सर्वांकडून सूचना मागवा : मॅनेजर्ससाठी ही युक्ती उपयुक्त ठरू शकते. कोणत्याही कर्मचा-या ला नव्या प्रकल्पावर त्याची कार्यपद्धती निश्चित करायला सांगा. त्यानंतर उर्वरित टीमकडून त्याबाबत सकारात्मक किंवा नकारात्मक सूचना मागवा. त्यातून तांत्रिक त्रुटी दूर होतील आणि नव्या आविष्काराचे मार्ग मोकळे होतील.
नियम-3 समस्या सोडवणा-या कडे दुर्लक्ष करा : आधी एखादे काम यशस्वीपणे करणा-या कर्मचा-या ंकडेच पुन्हा तशाच प्रकारचे काम सोपवण्याची मॅनेजर्सची मानसिकता असते. ते तत्काळ थांबवा. तुमच्याकडे सक्षम टीम आहे, मात्र अन्य नव्या व्यक्तीवर जबाबदारी सोपवा. त्यामुळे तुम्हाला तेच काम करण्याची नवीन पद्धत माहीत होईल.
नियम-4 गर्दीपासून अलिप्त राहणा-या ला कामावर ठेवा : साधारणपणे लवकर काम आत्मसात करणा-या आणि कोणत्याही टीममध्ये सहजपणे मिसळणा-या व्यक्तीलाच नोकरीवर ठेवले जाते. मात्र तुम्ही हळूहळू काम शिकणा-या कर्मचा-या ला नोकरीवर ठेवा. अशा व्यक्तींना गर्दीत सहभागी झाल्याचा ताण जाणवत नाही. अशा काही मिसफिट एलिमेंट्सना टीममध्ये सामील करून उत्पादकता वाढवा.
नियम-5 ग्राहकांना विचलित, दुर्लक्षित किंवा उबग आणण्याच्या युक्त्या शोधा : कदाचित तुम्हाला हे जरा विचित्र वाटेल. मात्र हे करून पाहाच. ही एक ब्रेनस्टॉर्मिंग अ‍ॅक्टिव्हिटी आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या उत्पादनामधील त्रुटी माहीत होतील आणि त्या दूर करण्याची पद्धतही सापडेल.