आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Independece Day Special: National Flag Of Tricolour

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वातंत्र दिन विशेष: इतिहास भारतीय तिरंगा ध्‍वज, राष्‍ट्रगीताचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र देशासाठी राष्‍ट्रगीत,राष्‍ट्रगान, राष्‍ट्रध्‍वज, राष्‍ट्रीय बोधचिन्ह खूप महत्त्वाची असतात. त्याशिवाय
देशाचे अस्तित्व नसते. आपल्या भारत देशाच्या राष्‍ट्रध्‍वज, राष्‍ट्रगीत,राष्‍ट्रगान,राष्‍ट्रीय बोधचिन्ह यांचा संक्षिप्त इतिहासाचा येथे आढावा घेतला आहे.

राष्‍ट्रध्‍वज: तिरंगी ध्‍वज
22 जुलै 1947 रोजी घटना समितीच्या बैठकीत 'तिरंगी ध्‍वज' भारताचा अधिकृत राष्‍ट्रीय ध्‍वज म्हणून स्वीकृत करण्‍यात आला.
तिरंग्यातील तीन रंग आणि अशोक चक्र -
ध्‍वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्‍यात आली आहे.
- वरच्या भागात गडद केशरी रंग आहे.या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो.
- मधल्या भागात पांढरा रंग आहे.या रंगातून शांती, सत्य, व पावित्र्याचा बोध होतो.
- खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निष्‍ठा व समृध्‍दीचा बोध होतो.
- अशोक चक्र हा कालचक्राच व त्यासोबत बदलत जाणा-या जगाचं सूचन करतो.