आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Independence Day Udaipur Rajasthan Riyasat Sardar Patel

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरदार वल्लभभाई पटेल यांनी जोधपूर नरेशांवर रोखले होते पिस्तूल!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उदयपूर- 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. विविधतेने नटलेल्या भारताला ऐतिहासिक संस्कृतीचा वारसा आहे. स्वतंत्र्यपूर्वी काळात भारतात संस्थानाची प्राचीन परंपरा होती. या ऐतिहासिक संस्थानांचे पाठबळ मिळवण्यासाठी भारताकडून सरदार वल्लभ भाई पटेल तर पाकिस्तानकडून मोहम्मद अली जिना प्रयत्नशील होते. दरम्यान, काही संस्थान प्रमुखांची भूमिकाही संभ्रमावस्था निर्माण करणारी होती. काही संस्थान प्रमुखांचा कल कधी भारताकडे होता तर कधी पाकिस्तानकडे. यात राजस्थानमधील संस्थानांचाही समावेश होता. मात्र त्यात सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या दृढ आत्मविश्वासाच्या जोरावर राजस्थानमधील बहुतेक संस्थान भारतात विलीन करून घेतले होते.

स्वतंत्र्य दिनानिमित्त 'दिव्य मराठी ऑनलाईन' आपल्या वाचकांसाठी स्वातंत्रपूर्व काळातील एक थक्क करणारी घटना देत आहे. ती पुढीलप्रमाणे...

ही घटना सन 1949 मधील आहे. जयपूर, जोधपूर सोडून उर्वरित संस्थान राजस्थानात विलीन करण्यात आले होते बिकानेर आणि जैसलमेर सारखे संस्था जोधपूर नरेश यांच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत होत्या. परंतु जोधपूर नरेश महाराजा हनुवंत सिंह त्या काळात मोहम्मद जिना यांच्या संपर्कात होते.

जिना यांनी हनुवंत सिंह यांना पाकिस्तानात विलीन करण्याचे आवाहन केले होते. एवढेच नाही तर पंजाब-मारवाड प्रांताचे प्रमुख बनाण्याचेही प्रलोभन दाखवले होते.

पुढील स्लाईडवर क्लिक करून वाचा, 'नरेश हनुवंत सिंह यांनी सरदार पटेल यांना भीती दाखवण्यासाठी रोखली होती पिस्तूल'