आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारगिल युद्धाचे 14 वर्ष, चार हजार पाकिस्तानींना मारून रचली वीरगाथा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कारगील युद्धाला आज (शुक्रवार) १४ वर्ष पूर्ण झाले आहेत. परंतु, तरीही या युद्धाची वीरगाथा आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात तेवढीच जीवंत आहे. पाकिस्तानी लष्कराचे जवान मे १९९९ मध्ये कारगिल सेक्टरमध्ये घुसखोरांच्या रुपात आले. त्यानंतर त्यांनी अनेक महत्त्वाच्या भारतीय सीमा चौकींवर कब्जा केला. पाकिस्तानी लष्कराला भारतीय भूमिवरून हुसकावून लावण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन विजय सुरू केले. यात भारतीय लष्कराचे सुमारे ३० हजार जवान सहभागी झाले. भारतील लष्कराला मदत करण्यासाठी भारतीय हवाई दलाने २६ मे रोजी ऑपरेशन पांढरा समुद्र सुरू केले. भारतीय नौदलाने समुद्रमार्गे पाकिस्तानला मिळणारी मदत रोखण्यासाठी पश्चिम किनारपट्टीवर महत्वाची जहाजे तैनात केली. २६ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने कारगिलला पाकिस्तानच्या ताब्यातून मुक्त केले. तेव्हापासून प्रत्येकवर्षी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो.

जगभरात उंच पर्वतांमध्ये झालेल्या युद्धांपैकी कारगिल युद्ध एक ताजे उदाहरण आहे. १९६९ मध्ये चीन आणि सोवियत संघराज्य यात झालेल्या संघर्षानंतर अण्वस्त्रसज्ज असलेल्या दोन देशांमध्ये जमीनीवर झालेले हे दुसरे युद्ध होते. या युद्धात दोन्ही देशांच्या लष्कराचे मोठे नुकसान झाले. सुरवातील पाकिस्तानने दावा केला होता, की त्यांचे केवळ ३७५ जवान ठार झाले आहेत. परंतु, नंतर स्पष्ट झाले, की पाकिस्तानचे किमान चार हजार जवान या युद्धात मारले गेले. भारतीय लष्करातील ५४३ अधिकारी आणि जवानांना या युद्धात वीरमरण आले तर सुमारे १३०० जवान जखमी झाल्याचे समजते. केवळ एका भारतीय जवानाला पाकिस्तानी लष्कराने पकडले होते. त्याचीही नंतर सुटका करण्यात भारताला यश आले. कारगिल युद्धात ठार झालेल्या भारतीय जवानांचा वयोगट १९ ते ३५ असा होता.