आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: या सुंदर पाकिस्तानी बालेवर भाळला एक भारतीय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंडिगड- भारतीय लष्करातील निवृत्त लेफ्टनंट जनरल पी. एन. हूण यांचा नातू कनव याचे पाकिस्तानी व्यापारी मियॉं मोहम्मद सिद्दीक यांची मुलगी समाया सिद्दीक हिच्यासोबत अगदी राजेशाही पद्धतीने लग्न झाले. शुक्रवारी हॉटेल ताजमध्ये झालेल्या रिसेप्शनमध्ये दोन्ही कुटुंबाचे मित्र आणि नातलग सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला पंजाबचे आमदार राणा गुरजीतसिंग, राणा गुरमीतसिंग, केवल ढिल्लों, बृजेंद्रसिंह, माजी आमदार चंद्रमुखी शर्मा, चंडिगड गोल्फ क्लबचे अध्यक्ष जी. एस. संधू यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

लाहोर येथील निवासी समाया हिचे वडील मियॉं मोहम्मद सिद्दीक व्यापारी होते. त्यांचे काही वर्षापूर्वी निधन झाले आहे. समायाची आई फौजिया सिद्दीक या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यांनी पाहुण्यांचे मनापासून स्वागत केले. जनरल हूण ताज हॉटेलमध्ये आल्यावर लष्करी बॅंडची धून वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले.
फोटो: रविंदर भाटिया

बघुयात या राजेशाही लग्नाचा खास अल्बम.... पुढील स्लाईड्सवर...