आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानसोबत युद्धाची भारताची तयारी किती...? जाणून घ्या...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी भारतीय हद्दित तब्बल ४०० मीटर घुसखोरी करून पाच भारतीय जवानांना ठार मारल्याच्या घटनेवर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानात जाऊन त्यांचे दुपट्ट जवान ठार मारावे, अशी मागणी केली जात आहे. आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये १९४८, १९६५, १९७१ आणि १९९९ मध्ये चार युद्धे झाली. यात पाकिस्तानला नामुष्की पत्करावी लागली असली तरी भारताला बाधा पोहोचविण्याची पाकिस्तानची मनोवृत्ती कायम राहिली आहे.

१९७१ च्या युद्धात सपशेल शरणागती पत्करावी लागल्याने लष्करी ताकद वाढविण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करीत आहे. चालू आर्थिक वर्षात पाकिस्तानने लष्करी खर्चात तब्बल १५ टक्क्यांनी वाढ केली आहे तर भारताने संरक्षण खर्चात ५ टक्क्यांनी वाढ केली आहे. तालिबानसोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे लष्करी खर्चात वाढ केल्याचा बनाव पाकिस्तानने केला असला तरी त्याचा वापर भारतविरोधी कारवाया करण्यासाठी होणार असल्याचे सर्वज्ञात आहे.

हवाई बळात पाकिस्तान आहे भारतापुढे, वाचा पुढील स्लाईडमध्ये..