आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IND DAY... यामुळे भारतीय लोकशाही राहिली अबाधीत!!!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताच्या स्वातंत्र्याला आज (ता.15) 66 वर्षे पूर्ण झाली. गेल्या दशकांमध्ये देशाच्या जडणघडणीत अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या. त्याचे सिंहालोकन करताना भारतीय लोकशाही अखंड कशी राहिली याचे कारण स्पष्ट होते. जगातील सर्वाधिक विविधता भारतात असूनही राजकीय, सा‍माजिक बदल प्रचंड विरोधात, परंतु जनतेचे हित समोर ठेवून झाल्याचे दिसून येते.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाश्चिमात्त्य देशातील अभ्‍यासक, विश्लेषक, संशोधक, पत्रकार यांनी देशाच्या पुढील वाटचालीबद्दल संदेह व्यक्त केला होता. परंतु, भारताने सर्व आघाड्यांवर भरीव प्रगती साधली आहे. आज भारत एकसंघ आहे, आणि जगात एक महाशक्ती म्हणून उदयास येत आहे. गेल्या सात दशकाच्या प्रवासात प्रत्येक कठिण प्रसंगांना खंबीरपणे तोंड दिल्याने हे शक्य झाले आहे. 1947 मध्ये भारत स्वातंत्र झाला त्यावेळी भारतात 565 स्वतंत्र संस्‍थाने होती. त्यांना भारतात किंवा पाकिस्तान विलीन होण्याचा किंवा स्वतंत्र राहण्याचा पर्याय देण्यात आला होता. परंतु, बहुतेक संस्थाने भारतात विलीन झाली. यासाठी लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान मोलाचे ठरले. 26 जानेवारी 1950 रोजी भारत प्रजासत्ताक राष्‍ट्र झाले.

पुढील स्लाईडसमध्ये वाचा घटना घडामोडी...