आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Election Guide वाचा भारताच्या निवडणूक वाटचालीविषयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशात सध्या लोकसभा निवडणुकीची धूम सुरू आहे. 16व्या लोकसभेसाठी मोठ्या धूमधडाक्यात प्रचाराचा जोर चढला आहे. निवडणूक आयोगाने या वेळी निवडणूक कार्यक्रमाचे स्वरूप मोठे केले असून सव्वा महिना हे निवडणूक पर्व सुरू राहणार आहे. देशाच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच असे होत आहे. लोकसभा निवडणुकीसंदर्भातील विविध गोष्टी आणि रंजक माहिती या लेखात देण्याचा प्रयत्न करत आहोत.
* 1952 मध्ये देशात झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांची संख्या 17.6 कोटी एवढी होती. त्या वेळी 61 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
मतदानाविषयी लोकजागृती करणे हा ‘डीबी स्टार’चा मुख्य उद्देश आहे. जेवढे जास्त मतदान होईल, तेवढी जास्त लोकशाही बळकट होईल. महाराष्ट्रात 10, 17 आणि 24 एप्रिल या तारखांना मतदान होत असून आपण सर्वजण मतदानाचा हक्क बजावाल, अशी ‘डीबी स्टार’ चमूला आशा आहे.
* 2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी 81.4 कोटी मतदार मतदानासाठी पात्र ठरले. ही संख्या युरोपच्या एकूण लोकसंख्येएवढी आहे.
यंदाच्या निवडणुकांमध्ये...
० देशभरात मतदानासाठी जवळपास 9,30,000 मतदान केंद्रे तयार केली जातील. 2009 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत हा आकडा 12 टक्क्यांनी जास्त आहे.
० ट्रान्सजेंडरसुद्धा इतर लिंगाच्या रूपात नोंदणी करू शकतात. देशात अशा मतदारांची संख्या 28,314 एवढी आहे. तसेच या वेळी 11,844 अनिवासी भारतीयांची नावेदेखील मतदार यादीत आहेत.
० लोकसभा निवडणुकीत एका मतदारसंघासाठी निवडणुकीचा सरासरी खर्च 5 कोटीपर्यंत अंदाजित आहे. यापूर्वी सरकारी रेकॉर्ड्सनुसार 2009 मध्ये एक लोकसभा निवडणूक घेण्याचा खर्च 2 ते 3 कोटी रुपये होता.
० आम आदमी पक्षाची ही पहिली लोकसभा निवडणूक आहे. इतर पक्षांच्या तुलनेत पहिल्याच निवडणुकीत त्यांनी सर्वात जास्त उमेदवार मैदानात उतरवण्याचा विक्रम केला आहे. त्यांनी 400 पेक्षा जास्त उमेदवार उतरवले आहेत.
० लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच ‘नोटा’चा पर्याय वापरण्यात येणार आहे. गेल्या वेळी पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा नोटाचा पर्याय ठेवण्यात आला होता.
11 वेळा लोकसभा निवडणूक जिंकून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) ज्येष्ठ नेते इंद्रजित गुप्त आतापर्यंतचे सर्वाधिक वेळा लोकसभा जिंकणारे खासदार आहेत. 2001 मध्ये त्यांच्या मृत्यूवेळीदेखील ते खासदार होते. त्यांना फादर ऑफ हाऊस म्हटले जात होते.
वाजपेयींची कमाल
अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावे अनोख्या विक्रमाची नोंद आहे. चार वेगवेगळ्या राज्यांत (उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश व दिल्ली) विजयी होणारे ते एकमेव खासदार आहेत. एवढेच नाही, तर वेगवेगळ्या सहा मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करणारे ते एकमेव खासदार आहेत. बलरामपूर-1957 आणि 67, ग्वाल्हेर-1971, नवी दिल्ली-1977, 80, विदिशा-1991, गांधीनगर-1996, लखनऊ-1991, 1996 आणि 98. अटल बिहारी वाजपेयी सहा वेळा खासदार होते.
पुढे वाचा कोणते विक्रम मोडले जातील .....