आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मान्यवरांमुळे आपले आयुष्य होईल सुखावह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दैनंदिन जीवनात उपयोगी ठरू शकणाऱ्या वस्तू तयार करणारे देशात अनेक जण आहेत. एका कॅन्सरतज्ञाने कॅन्सरग्रस्तांसाठी उपयोगी ठरू शकणाऱ्या स्वस्तातील उपकरणाची निर्मिती केली आहे, तर अन्य एका शास्त्रज्ञाने शेतकऱ्यांसाठी अनोखे अवजार आणले आहे. सरकार १६ रोजी स्टार्टअप्ससाठी कृती आराखडा जाहीर करणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची माहिती...

५० रुपयांचे उपकरण घशाच्या कॅन्सरग्रस्त रुग्णास आवाज देईल
डॉ. विशाल राव - कॅन्सर तज्ञ

घशाच्या कर्करोगाने आजारी व्यक्तींना बोलण्यासाठी खूप त्रास होतो. त्यासाठी एक उपकरण बसवावे लागते. हे उपकरण केवळ ५० रुपयांत मिळू शकेल, याची कल्पना कराल काय? एखादी वस्तू १५ ते ३० हजार रुपयांत येऊ शकते ती एवढ्या कमी किमतीत कशी मिळू शकेल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र, बंगळुरूचे कॅन्सरतज्ज्ञ डॉ. विशाल राव यांनी हे करून दाखवले आहे. त्यांनी तयार केलेले आवाजाचे उपकरण यशस्वी ठरलेे. २०१६ मध्ये कॅन्सर रुग्णांसाठी ते फायदेशीर ठरू शकते. त्यांनी त्यास व्हाॅइस प्रोस्थेसिस असे नाव दिले आहे. ते गळ्यातच बसवले जाते. फुप्फुसात येणाऱ्या हवेवर व्हाॅइस बॉक्स कार्य करते. २.५ सें.मी. लांबीच्या या उपकरणाचे वजन २५ ग्रॅम आहे.
दोन वर्षांपूर्वी कर्नाटकातील दुर्गम खेड्यातील एक व्यक्ती डॉ. राव यांना भेटण्यासाठी आली होती. घशाच्या कॅन्सरच्या शस्त्रक्रियेमुळे तिला महिनाभरापासून धड खाता व बोलताही येत नव्हते. डॉ. राव यांनी त्याच्यासाठी काही औषध कंपन्यांशी सवलत आणि मदतीसाठी चर्चा केली. सुरुवातीस निधी संकलन केले. मात्र, त्यांचे एक हितचिंतक शशांक महेश यांनी इतरांच्या पैशावर अवलंबून राहण्याऐवजी स्वत:ची स्वतंत्र निर्मिती करण्याचा सल्ला दिला. यासाठी खूप पैसा लागेल याची राव यांना जाणीव होती. योगायोगाने शशांक यांनीच त्यांची मदत केली. यासाठी लागेल तेवढा पैसा गुंतवण्याची तयारी शशांक आणि राव यांनी दर्शवली. या उपकरणाच्या पेटंटसाठी अर्ज करण्यात आला आहे. उपकरण पुढील महिन्यापासून बाजारात उपलब्ध होणार आहे.

तंबाखूविरोधात मोहीम चालवल्यामुळे डॉ. राव यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. जुलै २०१२ मध्ये त्यांनी ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्व्हेमध्ये त्यांनी भाग घेतला होता. काही जणांनी माेहिमेला विरोध केला. ट्रॅफिक सिग्नलवर थांबले होते, तेव्हा त्यांच्या कारची काच ठोठावली आणि यानंतर ते बाहेर आल्यानंतर अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला चढवला. रस्त्यावरील लोकांनी अडवल्यामुळे समाजकंटकांना पळून जाणे भाग पडले. अशा परिस्थितीतही त्यांनी केवळ हार मानली नाही तर हे उपकरणही तयार केले.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर काही खास गोष्टींविषयी...