आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indians Less Happy Than Pakistanis, Bangladeshis: UN Report

भारतीयांपेक्षा पाकिस्तानी, बांगलादेशी जास्त आनंदी, युएनचा अहवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आर्थिक मंदिची चिंता तुम्हाला भेडसावित आहे, कांद्यांच्या वाढत्या दराने तुम्ही त्रस्त आहात, पेट्रोल-डिझेलचे दर तुमच्या जीवाचा संताप संताप करीत आहेत, वाढती महागाई तुमचे बजेट कोलमडत आहे, नोकरी जाण्याची तुम्हाला भीती आहे, की सुखवस्तू समाजातिल स्पर्धेत तुम्ही मागे पडला आहात... गेल्या काही वर्षांपासून भारतीय जरा तणावातच आहेत. कारणे काहीही असली तरी मेंदूवर ताण येण्याचे प्रमाण जरा जास्त झाले आहे. याचा परिणाम भारतीयांच्या जीवनावरही पडला आहे. अशा प्रकारच्या घडामोडींमुळे भारतीयांचा आनंद हिरावून घेतला जात असल्याचे दिसून येत आहे.

पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांच्या तुलनेत भारतीय जरा कमी आनंदी आहेत, असे संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केलेल्या अहवालात सांगितले आहे. यावरून भारतीयांचे जीवनमान कशा प्रकारे खालावत आहे, हे दिसून येते. आनंदी राहण्याचा भारतीयांचा मंत्र काळाच्या ओघात मागे पडल्याचे यावरून सिद्ध झाले आहे. त्यामुळेच भारतीयांच्या शारीरिक व्याधी वाढून आनंदाला ग्रहण लागले आहे.

आनंदाच्या निर्देशांकात कोण कोणते देश आहेत भारतीयांच्या पुढे.... पुढील स्लाईडवर क्लिक करा.