आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत भारताची पहिली महिला रेफरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाव : शाहीन अन्सारी, कराटे चॅम्पियन
वय- ४४
कुटुंब- पती सलाउद्दीन, दोन मुले
चर्चेत का? - जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत रेफरी म्हणून निवड

शाहिनच्या पालकांना वाटत होते की त्यांनी आत्मसंरक्षणासाठी काही कौशल्ये शिकावीत. त्यामुळे सातवीत असल्यापासूनच त्यांचे कराटे प्रशिक्षण सुरू झाले होते. आठवड्यात ६ वेळा त्या चांगला सराव करत. शालेय जीवनापासून ते महाविद्यालयापर्यंत त्यांचे वेळापत्रक ठरलेले होते. शाळेत अभ्यास पूर्ण करून घरी येणे. जेवण झाले की कराटे सराव सुरू होत असे. यासोबतच प्रत्येक कराटे स्पर्धेत त्या भाग घेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या स्पर्धेत उतरल्या. अनेक पदके जिंकली.

कराटे प्रशिक्षक सलाउद्दीन यांच्याशी विवाह केला. कराटेचे बनावट प्रमाणपत्र देण्याच्या प्रकरणाचा घोटाळा सलाउद्दीन अन्सारींनी उघडकीस आणला.

शाहिन सांगतात की, त्यांच्या समुदायात महिलांना कराटे शिकवणे फार दुर्मिळ घटना आहे. त्या ६ डिग्री ब्लॅक बेल्ट आहेत. त्यांची मुलेही कराटेमध्ये ५ डिग्री ब्लॅकबेल्ट असून राष्ट्रीय चॅम्पियन आहेत. २०१० मध्ये त्यांनी खेळातून निवृत्ती घेतली. मात्र, स्वत:चे प्रशिक्षण वर्ग सुरू ठेवले. आजही त्या मंुबईच्या माझगावहून सकाळी ६ वाजता महालक्ष्मी रेसकोर्सवर पोहोचतात. क्लास घेतात. घरी जातात व तेथेही प्रशिक्षण देतात. कराटे खेळणे सोडले, मात्र ऑगस्ट २०१० मध्ये त्यांनी रेफरीसाठीच्या परीक्षा दिल्या. रेफरी होण्यासाठी तुम्हाला ६ पातळ्यांवर परीक्षा द्याव्या लागतात. याची नावे आहेत. जसे दोन परीक्षा ‘काटा’साठी द्याव्या लागतात, चार ‘कुमिते’साठी. या अनुक्रमे खंडाच्या स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर असतात. याचे निकाल आले आणि रेफरी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्या भारतातूनच नव्हे तर दक्षिण अशियातून पहिल्या आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपसाठीच्या महिला रेफरी आहेत. विश्व चॅम्पियनशिपसाेबतच त्या ऑलम्पिकसाठीदेखील रेफरी म्हणून जाऊ शकतात. कराटे असोसिएशन ऑफ इंडियाच्या रेफरी कमिशनच्या त्या उपाध्यक्षा आहेत
- वर्ल्ड कराटे फेडरेशनमध्ये वुमन स्पाेर्ट््स कमिशनच्या सदस्या आहेत. ही संस्था जगातील कराटे क्रीडा प्रकारासाठीची सर्वोच्च संस्था आहे.
बातम्या आणखी आहेत...