आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्योग... व्हिडिओद्वारे महिन्याला पंधरा लाख कमाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्लंडमधील जॅमी नावाचा तरुण एका थंड पेय उत्पादनाच्या कंपनीत काम करतो. मात्र, सध्या उपजीविकेसाठी त्याने सुरू केलेल्या दुसऱ्या व्यवसायात तो प्रचंड यशस्वी होत आहे. जॅमी फेसबुकवरील न्यूजफीडचे होस्ट असून त्यावर तो नवनवीन पाककृतीचे व्हिडिओ तयार करून टाकत असतो. सुरुवातीला त्याचा हा उद्योग धिम्या गतीने सुरू होता, मात्र काही दिवसांतच त्याला प्रचंड लोकप्रियता मिळू लागली. आज तो दररोज पन्नास हजार रुपये कमावतो. म्हणजेच महिन्याला पंधरा लाख रुपये. २५ वर्षीय जॅमी ‘जंगल क्रिएशन्स’ या ऑनलाइन मीडिया ग्रुपचा संस्थापक आणि मालक आहे. बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी शिक्षण घेतलेल्या जॅमीने २०१४ पासून उत्पन्नासाठी अन्य माध्यमांचा वापर कसा करता येईल, यासाठी शोधाशोध सुरू केली होती. त्याने व्हायरल थ्रेड नावाची वेबसाइट सुरू केली. त्यावर लोकप्रिय व्हिडिओ तसेच बातम्यांचे संकलन होते. अनेक लोक फेसबुकच्या माध्यमातून या वेबसाइटवर जाऊ लागले. त्यानंतर त्याला या व्हिडिओसाठी जाहिरातीही मिळत गेल्या आणि आज त्याच्यासाठी हे उत्पन्नाचे मोठे साधन बनले आहे.
}itv.com
बातम्या आणखी आहेत...