आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रस्‍थापित व्‍यवस्‍थेविरोधात उघड भुमिका घेणा-या संपादिका गौरी लंकेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्‍येष्‍ठ पत्रकार, संपादिका व कार्यकर्त्‍या गौरी लंकेश या उजवी विचारसरणी व हिंदुत्‍ववादी राजकारणाच्‍या कडव्‍या समीक्षक म्‍हणुन ओळखल्‍या जातात. कन्‍नडमध्‍ये प्रकाशित होणा-या 'गौरी लंकेश पत्रिके' या साप्‍ताहिकाच्‍या त्‍या संपादिका होत्‍या.  
 
या साप्‍ताहिकाची स्‍थापना गौरी लंकेश यांचे वडील पी. लंकेश यांनी 1960 मध्‍ये 'लंकेश पत्रिके' या नावाने केली होती. ते कवी आणि लेखक होते. लंकेश पत्रिकेची ओळख सुरुवातीपासूनच व्‍यवस्‍थाविरोधी, जातव्‍यवस्‍थाविरोधी आणि धर्मनिरपेक्ष विचारांचे पुरस्‍कार करणारे, अशी होती. 2000मध्‍ये वडीलांच्‍या निधनानंतर गौरी लंकेश आणि त्‍यांचा भाऊ इंद्रजित लंकेश यांच्‍यात वाद झाल्‍यामुळे या पत्रिकेचे दोन भाग झाले. त्‍यापैकी एकाच्‍या गौरी लंकेश या संपादिका होत्‍या. 

संपादिका बनल्‍यानंतर गौरी लंकेश प्रस्‍थापित व्‍यवस्‍थेविरोधात, धर्माच्‍या सकुंचित राजकारणाची कठोर समीक्षा करणारे लेख लिहित असत. विशेष म्‍हणजे या पत्रिकेद्वारे शासन किंवा इतर कोणाकडूनही जाहिरात घेतल्‍या जात नसे. एकुण 50 जण या पत्रिकेत काम करायचे. दर आठवड्याला प्रकाशित होणा-या या साप्‍ताहिकामध्‍ये गौरी लंकेश संपादकीय लेख लिहित असत. त्‍यांचा शेवटचा लेख, कशा प्रकारे खोट्या बातम्‍या पसरवून समाजात धार्मिक तणाव निर्माण केला जातो, याविषयी होता. माध्‍यम स्‍वांतत्र्यांवर येणा-या निर्बंधाविरोधातही त्‍या सातत्‍याने आपला आवाज उठवत असत. 
बातम्या आणखी आहेत...