आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

18 व्या वर्षी युवराज तर 23 व्या वर्षी बनले छत्रपती, या आहेत शंभूराजांबाबत काही नोंदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी अल्पायुष्यामध्ये स्वराज्याचा लढा अगदी नेटाने पुढे चालवला. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. रयतेचे ते राज्य पुढे नेताना संभाजी महाराजांनीही सर्वस्व अर्पण करून स्वराज्याचा अश्व पुढे पुढे नेला. सुमारे 120 हून अधिक लढायांमध्ये भगवा ध्वज सतत उंचावत ठेवण्याचा भीम पराक्रम शंभूराजांनी गाजवला. दुसरीकडे त्यापूर्वीच  बुधभूषण सारखा संस्कृतग्रंथ आणि इतर ग्रंथ लिहून त्यांनी बुद्धीकौशल्याचे दर्शन सर्वांनाच घडवले होते. 

१४ भाषांवर प्रभुत्व मिळवलेल्या संभाजीराजांची राज्यकारभाराची पद्धतही कुशल होती. पण शिवाजी महाराजांच्या नंतर स्वराज्याच्या सर्व शत्रूंनी एकत्रितपणे मराठा साम्राज्यावर हल्ले सुरू केले. एकाचवेळी अनेक शत्रूंना तोंड देताना शंभूराजांना फौजफाटा कमी पडत होता. तशातही 120 लढाया ते अजेय राहिले. त्यानंतर फितुरीचा फटका बसला आणि ते औरंग्याच्या तावडीत सापडले. असा जाज्वल्य इतिहास असलेल्या संभाजी राजांच्या जयंतीनिमित्त (14 मे) त्यांच्या प्रेरणादायी जीवनाचा आपण धावता आढावा घेणार आहोत. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, 32 वर्षांच्या अल्प कार्यकाळातील संभाजी महाराजांचा जीवनप्रवास ..
 
शंभूजयंती विशेष...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...