आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FACTS: अँटी टेररिस्ट स्कॉड (एटीएस)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहशतवादाशी लढा देण्यासाठी ही स्पेशल फोर्स तयार करण्यात आली. 30 ते 35 पोलिस अधिकार्‍यांचा यामध्ये समावेश असतो. मुंबई येथे एटीएसचे मुख्य कार्यालय असून काही प्रमुख शहरांत त्याच्या शाखा आहेत. सध्या आयपीएस अधिकारी के.पी. रघुवंशी हे एटीएसचे प्रमुख आहेत. 1990 मध्ये मुंबई पोलिसचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त ए.ए. खान यांनी त्याची स्थापना केली होती. ‘लॉस एंजलिसच्या पोलिस डिपार्टमेंटच्या स्पेशल वेपन्स अँड टॅक्टिक्स (एसडब्लूएटी) फोर्स’च्या धर्तीवर खान यांनी त्याची स्थापना केली होती. अनेक दहशवादी हल्ले रोखण्यामध्ये एटीएसने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

आरोपही झाले

एटीएसची स्थापना दहशतवादाशी लढण्यासाठी झाली आहे. मात्र त्यावर मानवाधिकाराचे उल्लंघन केल्याचे अनेक आरोपही लागत आले आहे. 16 नोव्हेंबर 1991 मध्ये लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये झालेले शूटआऊट त्याचे मुख्य उदाहरण आहे. या चकमकीत माया डोळस व दिलीप बुवासह सात गँगस्टर मारले गेले होते. त्यानंतर एटीएसकडून अनेक शूटआऊट करण्यात आले. मात्र, 1993 मध्ये एटीएसला बरखास्त करण्यात आले. त्यानंतर एटीएस प्रमुख ए.ए. खान यांची आयसीपी अँटी नक्सलाइट डिव्हिजनमध्ये बदली करण्यात आली. त्यानंतर महिनाभरातच मार्च 1993 मध्ये मुंबईत बाँम्बस्फोट होऊन गुन्हेगारीचा दर वाढण्यास सुरुवात झाली. एटीएस पुन्हा कामाला लागली. 26 नोव्हेंबरमध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान बचावकार्यात एटीएसची महत्त्वाची भूमिका राहिली.