आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FACTS: कृष्णविवर (ब्लॅक होल)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आकाशगंगेमध्ये एक ब्लॅक होलने (कृष्णविवराने) गुरू ग्रहापेक्षाही मोठय़ा ग्रहाला गिळंकृत केले आहे. काय आहेत ब्लॅक होल आणि त्यांची निर्मिती कशी होते याविषयी..

मोठय़ा तार्‍याच्या स्फोटानंतर अथवा त्याच्या मृत्यूनंतर राहिलेल्या अवशेषांपासून ब्लॅक होल तयार होत असते. तारा गॅसपासून बनलेला असतो. त्याच्यातील गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे त्यामध्ये स्फोट होत राहतात. तार्‍याचा आकार त्याच्यातील गुरुत्वाकर्षण शक्ती व स्फोटक शक्तीमध्ये संतुलन बनवून ठेवतो.

तार्‍याचा स्फोट झाल्यानंतर न्यूक्लियर फ्यूजन (नाभिकीय संलग्न) क्रिया बंद पडते. कारण, या क्रियेसाठी इंधन उपलब्ध होऊ शकत नाही. यामुळे तार्‍याचे गुरुत्वाकर्षण मटेरियल्सला आत ओढते आणि त्यावर दाब देते. यातूनच सुपरनोव्हा स्फोट होतो आणि त्याचे कण अंतराळामध्ये पसरतात.

या स्फोटातून अंतराळात पसरलेल्या या कणांना कोअर म्हटले जाते. हे कण प्रकाशात दिसत नाहीत. हळूहळू हेच कण ब्लॅक होलचे रुप धारण करतात. कोअरचे गुरुत्वाकर्षण खूप असते. त्यामुळे ते स्पेस टाइममध्ये तुटण्यास सुरुवात होते. त्यातूनच स्पेस टाइममध्ये मोठे छिद्र तयार होते. त्यामुळेच या कोअरला ब्लॅक होल म्हटले जाते.

* श्वार्जचाइल्ड (नॉन रोटेटिंग ब्लॅक होल) व केर (रोटेटिंग) असे दोन प्रकारचे कृष्णविवर असतात.

* ब्लॅक होलची विशालता, इलेक्ट्रिक चार्ज व रेट ऑफ रोटेशन (फिरण्याचे प्रमाण) या तीन गोष्टींनी मोजली जाते.

* ब्लॅकहोलच्या आजूबाजूला फिरणार्‍या गोष्टींची हालचाल, गुरुत्वाकर्षण लेन्सचा प्रभाव व रेडिएशनचे उत्सर्जन या तीन गोष्टींच्या माध्यमातून ब्लॅक होलचे अस्तित्व जाणून घेता येते.