आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING FACTS: नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंध्र प्रदेशातील हैदराबादच्या दिलसुखनगरात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाची चौकशी राज्य पोलिस, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीमार्फत करू इच्छित आहे. केंद्र सरकारने दहशतवादाला लगाम घालण्यासाठी स्थापन केलेली एनआयए ही केंद्रीय संस्था आहे. राधा विनोद राजू या एजन्सीच्या संस्थात्मक डायरेक्टर जनरल होत्या. सध्या या एजन्सीची जबाबदारी एससी सिन्हा यांच्या खांद्यावर आहे. एनआयए अँक्ट संपूर्ण देशात समान रूपात लागू होतो. या कायद्यांतर्गत येणार्‍या प्रकरणांची सीआरपीसीनुसार स्पेशल कोर्ट सुनावनी करू शकते. 90 दिवसांनंतर कोणत्याही अपीलवर सुनावणी होत नाही.

2008 मध्ये नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या स्थापनेसंबंधीचा कायदा संसदेमध्ये पास करण्यात आला. 30 सप्टेंबर 2008 रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या स्वाक्षरीनंतर एनआयए बिल अँड अनलॉफुल अँक्टिव्हिटी (प्रिव्हेंशन) अमेंडमेंट कायदा अस्तित्वात आला.

* 31 सप्टेंबर 2008 मध्ये एनआयए अँक्टनुसार नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी अस्तित्वात आली. ही संस्था सेंट्रल काउंटर टेरेरिझम लॉ इन्फोर्समेंट एजन्सीच्या अखत्यारीत देशात काम करत आहे. नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर या संस्थेच्या स्थापनेची गरज भासली.

प्रमुख अतिरेक्यांना केले गजाआड

2012 मध्ये एनआयएने इंटरपोल व सौदी इंटेलिजन्स एजन्सीच्या मदतीने अनेक अतिरेक्यांना पकडले. ज्यामध्ये पाकिस्तानचा अबू जिंदाल ऊर्फ अबू हमजा व भारताचा फैजा मोहंमद या अतिरेक्यांचाही समावेश आहे.