आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगीतात भूतकाळ-भविष्याला सांधण्याचे एडेलकडे कसब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटीश पाॅपगायिका यशस्वितेच्या शिखरावर आहे. त्यांचा नवीन अल्बम -२५ ने विक्रीचे सर्व विक्रम ताेडले आहेत. अनुमान असे हाेते की २५ या अलबमच्या दहा लाख प्रती पहिल्या आठवड्यात विकल्या जातील. आणि २० लाख प्रतींची विक्री तर आश्चर्यदायक ठरेल. मागे २००० साली एन सिंक बंॅडच्या अलबममध्ये नाे स्ट्रिंग्ज अटॅच्डच्या २० लाख ४२ हजार काॅपी विकल्या गेल्या हाेत्या. मात्र, पहिल्या आठवड्याची सांगताही झाली नसताना अलबम २५ च्या ३० लाख ३८ हजार प्रती विकल्या गेल्या. अलबम विक्रीच्या इतिहासातील ही सगळ्यात माेठी विक्री हाेती.

एडेल आपल्या अल्बमच्या प्रसारासाठी काही दिवसांपूर्वी अमेरिकेत आली हाेती. त्यांनी ‘टाइमला सांगितले की त्यांना विक्रमी विक्रीमागील रहस्य माहीत नाही. हे काहीसे हास्यास्पद आहे. मी अमेरिकन नाही. २७ वर्षाची ही गायिका सांगते की बहुदा अमेरिकी नागरिकांना असे वाटते की माझे महाराणीशी काही नाते आहे. शाही घराण्याप्रती अमेरिकन नागरिकांना आकर्षण आहे. हे म्हणणे मला अयाेग्य वाटते. त्यांचा मागील अल्बम २१ ने २०११ -१२ साली सर्वाधिक विक्रीचा विक्रम केला हाेता. संपूर्ण जगात त्या अल्बमच्या काेटीहून अधिक प्रती विकल्या गेल्या हाेत्या.

अलबम -२५ चे प्रमुख गाणे हॅलाेला यु ट्युबवर प्रतीतास १६ लाख लाेकांनी बघितले आहे. एडेलने ज्या प्रकारे पुन्हा एकदा संगीताच्या क्षेत्रात धडक मारली आहे, तसे यापूर्वी कुणीच करू शकलेले नाही. पाॅप संगीताच्या विश्वात एडेल तिच्या समकालीनांपेक्षा वेगळी आहे. ती जुन्या दिवसांची आठवण करून देते. तिने मागील अल्बमप्रमाणेच नूतन अल्बममध्येही पाॅपचा जुना आत्मा जिवंत राखण्याचे काम केले आहे. तिची गाणी मनाला स्पर्श करून जाणारी सहज तरल आहेत. तिच्या आवाजातही एक जादू आहे. पाॅप - राॅक ग्रुप वन रिपब्लिकचे प्रमुख गायक रायन टेडर सांगतात की एडेलचा आवाज खूपच दमदार आहे. एकदम स्वच्छ, स्पष्ट. तसेच तिच्या आवाजात एकप्रकारचा विश्वास आहे.

लाेकदेखील एडेलच्या आवाजाबाबत विश्वासार्ह अशा शब्दाचा उल्लेख करतात. त्यांना ब्रांड या शब्दाबाबत आकस आहे. खास प्रतिमा बनवण्यासाठी ज्या प्रकारांचा अवलंब केला जाताे, त्याच्याशी तिला काहीच घेणेदेणे नाही. प्रसिध्दी प्राप्त झाल्यानंतर अनेक कलाकार भीतीदायक वाटायला लागतात. जर मला तुम्ही आवडत नसाल तर माझ्या घरात तुमचा काेणत्याही प्रकारे प्रवेश मला आवडणार नाही. एडेल पाॅप संगीताचा भूतकाळ आणि भविष्यकाळाला जाेडणारा एक पूल आहे. ती स्पष्टवक्ती आहे. भाषणांमध्ये आपल्यावरच टीका करते. लंडनजवळच्या टाेटनहॅममध्ये लहानाची माेठी झालेली एडेल लारी ब्लू एडकीन्सला १४ व्या वर्षीच ललित कलांच्या वरिष्ठ शाळा मानल्या जाणाऱ्या ब्रिटनमध्ये प्रवेश मिळाला. एमी वाइनहाऊस, लिआेना लुईससारखे जगविख्यात कलाकार इथूनच घडले आहेत. १९ व्या वर्षी तिचा पहिला अल्बम प्रसिद्ध झाला. त्यामुळे ती लगेचच ब्रिटनमध्ये प्रसिद्ध झाली. २००८ मध्ये सॅटरडे नाईट लाइव्ह परफाॅर्मन्सनंतर तिला अमेरिकेसह अन्य पश्चिमी देशांमध्ये लाेकप्रियता मिळाली. पुढील वर्षी ‘राेलींग इन डीप’ या गाण्याने संपूर्ण विश्वात तुफान माजवले.

एडेल जेव्हा लाेकप्रियतेच्या सर्वाेच्च शिखरावर हाेती , तेव्हा ती काही अन्य बाबींची तयारी करीत हाेती. मुलांना जन्म दिल्यानंतर तिने रेकाॅर्डींग आणि शाे बंद करुन टाकले. त्यांनी आईच्या भूमिकेबाबत गाणी लिहायला प्रारंभ केला. तिथून तिच्या या प्रकारच्या लिखाणाचा पाया घातला गेला. १९९० च्या दशकात ब्रिटनी स्पीअर्स आणि बॅक स्ट्रीट बाॅयज बंॅडच्या कलाकारांनी मॅक्स मार्टीन आणि त्यांच्या गीतलेखकांच्या गाण्यांचे ध्वनीमुद्रण सुरू केले हाेते. ते अमेरीकन आणि युराेपीय नृत्य , संगीताचे मिश्रण सादर करतात. त्यानंतर वीस वर्षांनीदेखील मार्टीन टेलर स्विफ्ट , केटी पेरीसहीत अनेक गायकांची गाणी लिहितात. तसे टेलर , स्विफ्टदेखील त्यांची गाणी लिहितात.

एडेल काही नियमांना मानते. आपल्या अन्य समकालीनांप्रमाणे प्रचार, प्रसारासाठी साेशल मीडियाचा वापर करीत नाही. ती म्हणते प्रख्यात लाेकांचे जनतेपर्यंत अधिक पाेहाेचणे हास्यास्पद आहे. जर मी कुठल्या फाेटाेवर पाच लाख लाइक्सची प्रतीक्षा करत बसले तर मी चांगली गाणी कशी लिहू शकेन. किंवा चांगले संगीत कसे तयार करू शकेन.

यशाचा नवा प्रवास
मागील अल्बम- २१ ने २०११-१२ मध्ये विक्रीचा विक्रम केला हाेता. त्याच्या तीन काेटी प्रती खपल्या हाेत्या.
एडलचा नवीन अल्बम-२५ चे प्रमुख गाणे हॅलाेला यू ट्यूबवर प्रतितास १६ लाख वेळा पाहण्यात आले.