आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्राध्यक्षांशी जवळीक, मुलगीही त्यांच्यात दिली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅम कुटेसा, युनोच्या आमसभेचे अध्यक्ष
जन्म- १ फेब्रुवारी १९४९
शिक्षण : कायद्याची पदवी, युगांडा
कुटुंब : जेनिफर नानकुंड (पत्नी), ६ मुले, १३ नातू-नाती.
चर्चेत : सुरक्षा परिषदेत सुधारणा करून नवे सदस्य घेणार असल्याचे त्यांनी नुकतेच म्हटले आहे.

सॅम यांचे वडील संपूर्ण आफ्रिकेत धर्माचा प्रचार करत होते. त्यामुळे घरात धार्मिक वातावरण होते. संयुक्त राष्ट्रात पद भूषवणारे ते १२ वे आफ्रिकन नेते आहेत. सॅम व्यवसायाने वकील आहेत. कायद्याची पदवी घेतल्यानंतर ते युगांडा उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करू लागले. एवढेच नव्हे त्यांनी जगभरातील खासगी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कंपन्यांसोबतही काम केले आहे. ते कंपनी कायद्यात तज्ज्ञ मानले जातात. वकिली करताना राजकारणाची ओढ लागली आणि त्यामुळे मबारारची निवडणूक लढली.
ते संसदेवर निवडून आले. यानंतर ते युगांडाच्या संविधान सभेमध्येही होते. २००१ ते २००५ पर्यंत ते गंुतवणूकमंत्री होते. २००५ मध्ये ते परराष्ट्रमंत्री झाले.

त्यांच्या मुलीचे लग्न युगांडाचे राष्ट्रपती योवेरी मुसेवेनी यांचा मुलगा ब्रिगेडियर मुहूजी कॅनरुगाबाशी झाले. यामुळे ते त्यांचे निकटवर्तीय आहेत. याच पद्धतीने सॅमही तीन वर्षांपासून युगांडा संसदेचे सदस्य आहेत. असे असले तरी २००९ मध्ये त्यांना आव्हान मिळू शकते, असे वाटत होते. मात्र, देशातील या सर्वात श्रीमंत नेत्याने निवडणूक जिंकली होती.

परराष्ट्रमंत्री असताना त्यांनी सुदान, दक्षिण सुदान आणि सोमालियामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. २०११ मध्ये आयरिश तेल कंपनी तुलो ऑइलकडून लाच घेतल्याचा त्यांच्यावर आरोप झाला. त्यांच्याविरुद्ध संसदीय चौकशीही करण्यात आली. मात्र, त्यातून काहीच निघाले नाही. २०१३ मध्ये संयुक्त राष्ट्रात आफ्रिकेला पद देण्याचा क्रमांक होता. आफ्रिकी युनियनच्या कार्यकारी परिषदेने सॅम यांची निवड केली. त्यांच्याविरुद्ध पत्रकबाजी झाली. युगांडातील सर्वात भ्रष्ट आणि श्रीमंत राजकीय नेते असल्याचा उल्लेख करत त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. गेल्या वर्षी त्यांची संयुक्त राष्ट्र आमसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली.