आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FACTS: रीडर्स डायजेस्ट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्या बेस्ट सेलिंग कंझ्युमर मॅक्झीन ‘रीडर्स डायजेस्ट’ची पॅरेंट कंपनी आरडीए होल्डिंग पुन्हा एकदा दिवाळे निघण्याच्या मार्गावर आहे. रीडर्स डायजेस्ट हे अमेरिकी मासिक 70 देशांमध्ये 21 भाषांतून प्रकाशित होते. आरडीए होल्डिंगसंबंधी कंपनीने यूएस बँकरप्टी कोर्टमध्ये प्रकरण दाखल केले आहे. दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर उभे राहण्याची चार वर्षांमध्ये कंपनीची ही दुसरी वेळ आहे.

रीडर्स डायजेस्ट या मासिकाचे जगभरात एक कोटी पाच लाख (10.5 मिलियन) एवढे सर्क्‍युलेशन आहे. मासिक जगतातील हा सर्वात मोठा पल्ला आहे. 1922 मध्ये या मासिकाचा पहिला अंक निघाला होता. इंग्लंड येथे 1929 मध्ये या मासिकाचा आंतरराष्ट्रीय अंक निघाला होता.