कोणीच विश्वास ठेवत नाही. इन्फोसिसच्या संस्थापकांपैकी एक एस.डी. शिबुलाल यांची अमेरिकेत 800 घरे आहेत. जर्मनीमध्येही संपत्ती आहे. कर्नाटक, केरळमध्येही कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. इन्फोसिसचे त्यांचे अन्य संस्थापक सहकारी (नारायण मूर्तींसह) केवळ कंपनीच्या शेअरच्याच भरवशावर असताना शेवटी एका आयटी तज्ज्ञाने हे सर्व कधी आणि कसे केले? इन्फोसिसमध्ये शिबुलाल यांची भागीदारी आहे 3500 कोटी रुपयांची, तर 6500 कोटी रुपयांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. ही एकूणच कथा केवळ आश्चर्यचकितच करणारी नाही, तर प्रेरणादायीही आहे.
आगामी सात पिढ्यांसाठी काही तरी करायचे होते म्हणून...
1. बीएमडब्ल्यू ब्रँडची स्थापना करणारे आणि सात पिढ्यांपासून जगात ब्रँडचे वर्चस्व कायम राखणारे जर्मनीचे क्वांत कुटुंब त्यांचा आदर्श आहे.
आयुर्वेदाचार्य वडील आणि उत्पादन शुल्क विभागातील कर्मचारी आईचे अपत्य शिबुलाल यांनाही सात पिढ्यांना फायदा मिळेल, असेच काही तरी करण्याची इच्छा होती. इन्फोसिसच्या नोकरीमुळे आगामी पिढ्यांच्या फार काही पदरात पडणार नाही, अशी त्यांची धारणा आहे.
2. ‘अमेरिकेतील रियल्टी क्षेत्राचा एक नियम आहे. जर तुमच्याकडे 10 लाख डॉलर असतील, तर तुम्ही 9 कोटी डॉलरची संपत्ती खरेदी करा आणि उर्वरित रक्कम त्याच्या किरायातूनच चुकती करा.’ -शिबुलाल
1991 मध्ये इन्फोसिस सोडून शिबुलाल अमेरिकेत गेले आणि 1996 पर्यंत सन मायक्रो सिस्टिमच्या उच्च् व्यवस्थापनात सहभागी राहिले. यादरम्यान त्यांनी रियल्टी मार्केट समजून घेतले. गृह कर्जाचे नियम अभ्यासले. अमेरिकी पासपोर्ट मिळवला आणि संपत्तीची खरेदी सुरू केली.
3. ‘महागाईशी लढण्याचे सामर्थ्य केवळ प्रॉपर्टी गुंतवणुकीतच आहे किंवा मग तुमच्यात गुंतवणुकीसाठी वॉरेन बफेटसारखे डोके तरी असायला हवे.’अमेरिकेतील सिएटलमध्ये भलेही
मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन, स्टारबक्सची मुख्यालये असतील; पण तेथील शेकडो एक्झिक्युटिव्हजना राहण्यासाठी शिबुलाल बंगले उपलब्ध करून देतात. ते यांचे भाडेकरू आहेत. जर्मनीतील फ्रँकफर्ट आणि बर्लिनमध्येही त्यांनी असेच अपार्टमेंट खरेदी केले आहेत.
अचानक नव्हे 30 वर्षांपासून खरेदी सुरू
इनोव्हेशन इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट ही शिबुलाल यांची कंपनी अमेरिका आणि जर्मनी व्यतिरिक्त भारतामध्येही कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीची मालक आहे.
- कुर्गमध्ये 170 एकरांत कॉफीची लागवड. 30 खोल्यांचे बुटीक.
- तामिळनाडू आणि कर्नाटकात मिळून 900 एकरमध्ये शेती
- थिरुवनंतपुरममध्ये 108 खोल्यांचे आणि कोडाईकनालमध्ये 54 खोल्यांचे हॉटेल.
इन्फोसिसच्या त्रिमूर्तीमध्ये शिबुलाल आघाडीवर
नारायण मूर्ती
संपत्ती 9626 कोटी रुपये. शेअर्स व छोट्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक. रिअल इस्टेटमध्ये फारसा रस नाही.
नंदन निलेकणी
संपत्ती 7700 कोटी. एफडी आणि शेअर्समध्ये गुंतवणूक. इन्फोसिसच्या शेअर्समधून 80 टक्के संपत्ती.
गोपालकृष्णन
एकूण संपत्ती 8122 कोटी रुपये. इन्फोसिसच्या शेअर्समधूनच. रियल्टीमध्ये फारसा रस नाही.