आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रेष्ठ व्यक्तींकडून मिळणारी प्रेरणा : इतका व्यायाम केला की, घरी येताना दोन वेळा पडले अरनॉल्ड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अरनॉल्ड श्वार्जनेगर- अभिनेता, बॉडी बिल्डर, दोन वेळा  कॅलिफाेर्नियाचे गव्हर्नर होते. - Divya Marathi
अरनॉल्ड श्वार्जनेगर- अभिनेता, बॉडी बिल्डर, दोन वेळा कॅलिफाेर्नियाचे गव्हर्नर होते.
- वडिलांनी जिममध्ये जाण्यास बंदी केली तेव्हा  तळघरात जिम  बनवली.  
- वयाच्या  विसाव्या वर्षी मिस्टर यूनिव्हर्स बनलेले एकमेव बॉडीबिल्डर
- पाच वेळा  मिस्टर युनिव्हर्स,सात वेळा मिस्टर आॅलम्पिया 
 
अरनॉल्ड श्वार्जनेगर बॉडी बिल्डर, हॉलीवूड स्टार आणि दोन वेळा झालेले  कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर. ३० जुलैला ते ७० वर्षाचे होतील. त्यांच्या टर्मिनेटर 2- जजमेंट डे या चित्रपटाला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली. आता हा चित्रपट थ्री डी मध्ये प्रदर्शित होत आहे.  
 
१९४७ मध्ये जेव्हा  अरनॉल्ड यांचा जन्म जेव्हा झाला, तेव्हा ऑस्ट्रिया हा  नाझी जर्मनीसमवेत आघाडी करून हरलेला एक देश होता. लष्कराच्या हालचाली त्यांच्या गावातही चालू होत्या.  त्या वेळी अनेक गैरसोयी होत्या. रेशनवरचे धान्य कसे तरी मिळायचे. शाळेेत जाताना ब्रिटीश रणगाडे जाताना दिसायचे.  हे रणगाडे त्यांना शाळेपर्यंत सोडत असत. आठवीपर्यंत येता येता  अरनोल्ड यांचे लक्ष शिक्षणापेक्षा सुतारकामाकडे वळू लागले. त्याचवेळी  त्यांनी एका मासिकात दक्षिण आफ्रिकेतील बॉडी बिल्डर आणि फिल्म स्टार रेज पार्क यांचे छायाचित्र पाहिले आणि अरनोल्ड त्यांच्या चित्रपटांचे फॅन झाले. अरनॉल्ड  शाळेच्या  फुटबॉल टीममध्ये होते आणि खेळाडंूना मजबूत बनविण्यासाठी वेटलिफ्टिंंग करण्यास सांगितले होते.  
 
ते पहिल्यांदा जिममध्ये गेले आणि ताकदवान बॉडीिबल्डर्स लोकांना पाहिले आणि त्यांना जाणवले की हेच आपले जीवन होय. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, माझ्या घरापासून जिम आठ मैल लांब होती. मी सायकलवरून जात असे. पहिल्यांदा जेव्हा मी जिममध्ये गेलाे तेव्हा पहिल्यापासून येणाऱ्यांनी इशारा दिला की, येथील मशिनरीचा उपयोग वेदनादायक असतो. पण मला असे वाटत होते की, मी याच्याही पुढे आहे. त्या दिवसाच्या व्यायामानंतर घराकडे निघताना सायकलवरून पडलो.  इतके कमजोर वाटत होते की, हातच उचलता येत नव्हता. पायाला मुंग्या आल्या होत्या. एखाद्या नुडल्सप्रमाणे पाय जाणवत होते. कसे तरी निघालो पण पुन्हा पडलो. नंतर पुन्हा सायकलवर चढलो. अर्धा मैल गेलो आणि पुन्हा पडलो. अरनॉल्ड सांगतात की, पुढच्या दिवशी शरीरात मांसपेशी असल्याचा प्रथम साक्षात्कार झाला. तेव्हा लक्षात आले की, वेदना हाेणे म्हणजे पुढे जाणे. 
 
त्यांचे वडील गुस्ताव हे दारूडे होते आणि नाझी पक्षाचे सदस्यही होते. मुलाने बॉडी बिल्डर बनू नये असे त्यांना वाटायचे. घरात नेहमी तणाव असायचा.  एका मुलाखतीत अरनोल्ड यांनी सांगितले की, वडील हातात बेल्ट घेऊन मला मारायला धावत असत. आईने उपचारासाठी एका डॉक्टरला बोलावले होते. त्यांना चिंता होती की, काही तरी गडबड आहे. माझ्या खोलीतील भिंतीवर पुरुषांचे फोटो का लावले आहेत? कारण मित्रांच्या रुमच्या भिंती मुलींच्या फोटाेंनी भरलेल्या असायच्या. वडिलांनी रोज जिममध्ये जाण्यावर बंदी घातली होती. अरनोल्डने यावरही उपाय काढला आणि तळघरातच जिम बनविली. त्यावेळी त्यांचे मार्गदर्शक कुर्त मरुनल यांचा आवाज कानात घुमत असे की, व्यायाम करताना जोपर्यंत तोंडातून आह असा आवाज येत नाही ताेपर्यंत व्यायाम थांबवायचा नाही.  चांगल्या बाॅडीबिल्डरचे हेच रहस्य आहे. ते प्रमाणापेक्षा जास्तच् ट्रेनिंग घेत होते.वयाच्या १६व्या वर्षी ते ज्युनिअर मिस्टर ऑस्ट्रिया झाले. विसाव्या वर्षी  मिस्टर युनिव्हर्स झाले. १९६८ मध्ये ते अमेरिकेत आले. 
बातम्या आणखी आहेत...