आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रेष्ठ व्यक्तिमत्त्वांकडून प्रेरणा : पोलिओची लस बनविली; स्वत:सह तीन मुलांवर लसीचा केला प्रयाेग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिओ हा विसाव्या शतकातील सगळ्यात भीतीदायक आजार होता. याची भीती इतकी असण्याचे कारण म्हणजे यावर उपाय काय हे शास्त्रज्ञांनाही समजत नव्हते.  दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेत झालेल्या पाहणीत हे समजले की, तेथील लाेकांमध्ये महायुद्धानंतर वाटणारी भीती म्हणजे पोलिओ होती. बहुतेक शास्त्रज्ञांना असे वाटत होते की, जिवंत विषाणूपासूनच पोलिओची लस करता येते. पण एक शास्त्रज्ञ जॉनस साल्क यांना काही वेगळेच वाटत होते की मृत विषाणूपासून अशी लस करता येणे शक्य आहे. त्यारंनी तसे करूनही दाखविले. पण अनेक शास्त्रज्ञांनी हा प्रयोग धोकादायक असल्याचे सांगितले.  वैज्ञानिक अलबर्ट साबिनही पोलिओची तोंडावाटे घेतली जाणारी लस तयार करत होते.  त्यांनी साल्क यांना स्वयंपाक घरातील शास्त्रज्ञ म्हणून संबोधले. पण साल्क यांनी आपले प्रयोग चालूच ठेवले. त्यांनी आपल्या लशीचा उपयोग हजारो माकडांवर केला. नंतर १९५२ पासून माणसांवर प्रयोग करणे सुरू केले. त्यांनी आपल्या घरातील स्टोव्हवर तीन सुया व सिरिंज पाण्यात उकळली आणि स्वत:, पत्नी आणि आपल्या तीन मुलांवर याचे प्रयोग केले. मार्च १९५३ मध्ये त्यांनी माणसावरचा लशीचा प्रयोग यशस्वी झाल्याचे राष्ट्रीय रेडिओवरही जाहीर केले. 
 
हे फार मोठे यश होते. एक  वर्षानंतर एप्रिल १९५४ मध्ये सहा वर्षाच्या एका मुलावर साल्क लशीचा प्रयोग करण्यात आला. जूनअखेर जवळ जवळ १८ लाख लोकांना पोलिओची लस देण्यात आली. यात हजारो शालेय मुलांचा समावेश होता. याचे नाव पोलिओ पायोनियर असे होते. अमेरिकेच्या इतिहासात हा सर्वात  मोठा प्रयोग होता.  पण ताेपर्यंत हे निश्चित नव्हते की, ही लस सुरक्षित आहे की नाही. साबिनने तर सांगितले की, पोलिओ थांबणे लांब राहिले पण हा रोग पसरतच जाणार आहे. पण याला विरोध होत असला तरी स्वयंसेवकांची काही कमी नव्हती.एक वर्षानंतर म्हणजे १२ एप्रिल १९५५ रोजी साल्कने बनविलेली लस सुरक्षित, प्रभावशाली आणि शक्तिशाली असल्याचे सांगितले गेले. यांनतर मुलाखतीत या लशीचे पेटंट कोणाकडे आहे असे विचारले गेले तेव्हा साल्कने सांगितले की लोकांच्या जवळ. त्याने सांगितले या लशीचे पेटंट नाही. तुम्ही सूर्याचे पेटंट घेऊ शकता का?   अशा प्रकारे या लशीचे पेटंट करण्यास साल्कने नकार दिला. २०१२ मध्ये फोर्ब्स पत्रिकेत प्रकाशित एका अहवालानुसार जर साल्क यांनी याचे पेटंट घेतले असते तर ते सात अब्ज डॉलर संपत्ती यातून निर्माण करू शकले  असते.  साल्क यांची ही लस व्यापक स्वरूपात वापर करण्याअगोदरच अमेरिकेत पोलिओचे दरवर्षी ४५ हजार प्रकरणे घडायची. पण लस आल्यानंतर त्यांची संख्या कमी होऊन १९०० इतकी घटली.  यानंतर १९६२ मध्ये साबिन यांनी तोंडाव्दारे घेता येऊ शकणारी पोलिओ लसही तयार केली. ही लस स्वस्त असल्याने पहिल्या लशीपेक्षा याचा वेगाने प्रसार झाला. पण या दोन्ही लशींमुळे जग पोलिआेमुक्त झाले. साल्क यांचा जन्म न्यूयार्कमध्ये २८ ऑक्टोबर १९१४ साली झाला होता. १९४२ साली ते मिशिगन विद्यापीठाच्या पब्लिक हेल्थ स्कूलमध्ये फ्लू रोगाविरूद्ध काम करणाऱ्यांच्या ग्रुपचा भाग व १९४७ मध्ये पीटर्सबर्ग विद्यापीठात व्हायरस संशोधन प्रयोगशाळेचे प्रमुख बनले. तेथे त्यांनी पोलिओवर संशोधन सुरू केले होते. मेडिकल क्षेत्राने त्यांच्याकडे कायम दुर्लक्ष केले. नोबेल पुरस्कारासाठी त्यांचे नाव अनेकदा निर्देशित झाले. पण त्यांना हा मानाचा पुरस्कार कधीच दिला गेला नाही. 
 
- पेटंट करण्यास नकार; म्हणाले, होते- सूर्याचे पेटंट होऊ शकते का? 
- ही लस येण्याअगोदर फक्त अमेरिकेत दरवर्षी ४५ हजार लाेक पोलिओमुळे अपंग व्हायचे 
- विराेधकांचे टोमणे असायचे की, साल्क हे किचन केमिस्ट आहेत. 
बातम्या आणखी आहेत...