आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असेंब्ली लाइन कामगार होत्या, आज 600 दालनांच्या मालक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेनी हेंड्रिक्स, सहसंस्थापक आणि अध्यक्ष एबीसी सप्लाय - Divya Marathi
डेनी हेंड्रिक्स, सहसंस्थापक आणि अध्यक्ष एबीसी सप्लाय
पती केनिथ यांच्यासह डेनी हेंड्रिक्सने १९८२ मध्ये रुफिंग कंपनी सुरू केली होती. २००७ मध्ये केनिथ यांचे निधन झाले. त्यानंतर डेनी कंपनी चालवत आहेत. गेल्या दशकभरात कंपनीचे उत्पन्न आणि व्याप्ती दुप्पट झाली आहे. २०१५ मध्ये कंपनीची ६०० पेक्षा अधिक दालने होती. ऑगस्ट २०१६ मध्ये त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या अर्थ सल्लागार म्हणून नियुक्त केले होते.  
डेनीचे वडील दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादक होते. त्यांना ८ बहिणी आहेत. मुलींनी डेअरी फार्ममध्ये काम करणे वडिलांना पसंत नव्हते. त्यांना मुलींनी घरकाम करावे असे वाटत. डेनीने वयाच्या १७ व्या वर्षी प्रियकरासोबत विवाह केला. त्यानंतर अपत्य झाले. त्याच वेळी  पार्कर पॅन कंपनीत त्यांनी असेंब्ली लाइनमध्ये काम सुरू केले. अधिक काळ आपण हे काम करू शकणार नाही याची जाणीव त्यांना झाली. तीन महिने येथे काम केल्यानंतर रिअल इस्टेट विक्रीची नोकरी मिळाली. या नोकरीसाठी त्यांना कोणत्याही परवान्याची गरज नव्हती. मात्र त्यांनी रिअल इस्टेट उद्योगाविषयी वाचन सुरू केले. आपला विवाह फारकतीच्या स्तरावर आल्याचे त्यांना जाणवले. वयाच्या २१ व्या वर्षी घटस्फोट घेतला.  

याच काळात एक व्यक्ती त्यांना ब्लँक कॉल देत होती. त्यांचे नाव होते केनिथ हेंड्रिक्स. त्यानंतर डेनी व केनिथचा विवाह झाला. त्यांनी सोबत काम केले. एबीसी सप्लाय समूहाची स्थापना केली. भेट झाल्यानंतर एका आठवड्यातच त्यांनी सोबत काम करण्यास सुरुवात केली. रूफ कंत्राटदार म्हणून केनिथ काम करत. तीन वर्षे दोघांनी १०० पेक्षा अधिक घरांची कामे केली. केनिथच्या वडिलांच्या मदतीने घरातील काम होत असे. डेनीने सांगितले की, त्या काळात त्यांनी अनेक घरांच्या आत स्वत: पेंट केले आहे. त्यानंतर दोघांनी रुफिंग वितरणाचे काम सुरू केले. २००७ मध्ये एका साइटवर पडल्याने गंभीर जखमी केनिथ यांचा मृत्यू झाला. त्या वेळी हेंड्रिक्स होल्डिंग कंपनीअंतर्गत ३० पेक्षा अधिक कंपन्या येत होत्या.  व्यवसायाची व्याप्ती वाढवायची यावर त्या ठाम राहिल्या. केनिथच्या मृत्यूनंतर एक वर्ष त्यांनी घरातूनच काम सुरू ठेवले.  

आज एबीसी समूह अमेरिकेतील सर्वात मोठा रुफिंग, विंडो इत्यादींचा ठोक वितरक आहे. आपल्याला काय करायचे आहे याची नेहमी जाणीव होती. काय साध्य करायचे आहे माहिती होते. कधीच पराभव न मानणे हा यशाचा मार्ग असतो, असे त्या सांगतात. इतरांचे अनुभव ऐकणे, चर्चा करणे आणि त्यातून शिकणे महत्त्वाचे असते, असे त्या मानतात.  

मी पूर्वी ज्या परिस्थितीत होते तशा लोकांशी बोलण्यास आवडते. तुमच्यासोबत काम करणाऱ्या लोकांची निवड करणेही महत्त्वाचे असते. तुमचे ध्येय आणि त्या दिशेने तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांविषयी त्यांना माहीत असले पाहिजे. अनेक निर्णय घ्यायचे असतात. मी माझ्या मनोभूमिकेवर विश्वास ठेवते. संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच एखादा निर्णय घेते. हीच पद्धत नेहमी मला उपयुक्त ठरली आहे. संपूर्ण यश कधीच मिळत नाही. ध्येय साध्य होत नसते. कारण आपले ध्येय पुन्हा नव्याने निर्माण होते. मिळाले त्यापेक्षा भव्य यश हवे असते. ही असंतुष्टताच आपल्याला पुढे नेत असते.
 
- एबीसी सप्लाय ग्रुपचा वार्षिक महसूल ५.९ अब्ज डॉलर्स आहे. कंपनीत ८००० पेक्षा अधिक कर्मचारी आहेत.  
- डेनीची संपत्ती ४.९ अब्ज डॉलर्स आहे.  
- १९८२ मध्ये हेंड्रिक्स दांपत्याने कंपनी सुरू केली. बड्या रुफिंग कंपनीत समावेश.  
बातम्या आणखी आहेत...