आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हात-पाय नाहीत तरीही 50पेक्षा जास्त देशांचे पर्यटन; प्रेरणादायी वक्ता अन् लोकांना करताे प्रोत्साहित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निक व्यूजिसिक फुटबॉल आणि गोल्फ खेळतात. पाेहतात आणि सर्फिंगही करतात. ३५ वर्षांचे निक इतरांना प्रेरणा देणारी व्याख्याने देतात. पन्नासपेक्षा जास्त देशांमध्ये त्यांनी प्रवास केलेला आहे आणि ते आता म्युझिक अल्बमही काढणार आहेत. हा अल्बम जानेवारी २०१८ मध्ये येईल. पण कल्पना करा की, निक यांनी हे सर्व कसे केले असेल. तेही हात आणि पाय नसताना. त्यांचा जन्म हातपाय नसलेल्या अवस्थेत झाला.  डाव्या मांडीच्या खाली छोटा पाय आहे, ज्याच्या सहाय्याने ते शरीराचे संतुलन ठेवतात. यातूनच ते फुटबॉलला किक मारतात आणि टायपिंगही करतात. याच्याच आधारे लेखणी पकडतात आणि लिहितातही.
 
फार दुर्मिळ  जन्मजात विकार असलेल्या मेडिकल कंडिशन टेट्रा-एमेली सिंड्रोमसह त्यांचा जन्म झाला. आणि जेव्हा पहिल्यांदा त्यांच्या वडिलांनी त्यांना पाहिले, तेव्हा त्यांना इतका  धक्का बसला की त्यांनी रूमच्या बाहेर येऊन उलटीच केली. बिचाऱ्या आईची तर मुलाला चार महिने मुलाला जवळ घेण्याची हिम्मतच झाली नाही.  आईवडील इतकेच नाही तर खुद्द निकही सज्ञान झाल्यानंतरही हा प्रश्न स्वत:ला विचारत होते की, असे आपल्याच बाबतीत का व्हावे? आई नर्स होती. आईवडील इतकेच काय पण ख्ुद्द निक हे सज्ञान झाल्यानंतरही त्यांना असे प्रश्न पडत होते की हे फक्त आपल्याच बाबतीत का व्हावे? आई नर्स असल्याने तिने गरोदरपणी स्वत:ची आवश्यक ती सर्व काळजी घेतली होती आणि बराच काळ स्वत:ला ती दोष देत असे.  हातपाय नसलेल्या निकला पाहणे हा तिच्या दृष्टीने एक अवघड अनुभव होता. पण तिने निकला आत्मनिर्भर बनविण्यासाठी शक्य ते  सर्व प्रयत्न केले. नंतर वडिलांनीही धीर दिला.
 
निक १८ महिन्यांचा झाला तेव्हा वडिलांनी त्याला पाण्यात उतरविले. निकचे वडील संगणक प्राेग्रामर आणि  अकाउंटंट होते. निक सहा वर्षाचा झाला तेव्हा वडिलांनी त्याला छोट्या पायाने टायपिंग करण्यास शिकविले. आईने एक प्लास्टिक उपकरण बनविले,ज्याच्या माध्यमातून ते छोट्या पायाने  पेन आणि पेन्सिल पकडता येईल.   त्याला शाळेत घातले तर तो शिकू शकेल का, त्याचे सहकारी त्याच्याशी कसे वागतील अशा शंका होत्या. तरीही त्याला सामान्य मुलाप्रमाणे शाळेत प्रवेश दिला गेला. हा माझ्या आयुष्यातील सर्वात माेठा निर्णय ठरला, असे निक आता सांगतात. याच्या आधारावरच निक यांनी पुढे फायनान्शियल प्लॅनिंग आणि रिअल इस्टेटमध्ये डिग्री घेतली.
 
ते सांगतात की, जेव्हा मी आठ वर्षांचा होतो तेव्हा अतिशय निराश झालो होतो. मी आईला सांगितले की, मला जगण्याची इच्छाच नाही. मी ईश्वराला दोष देत होतो आणि असा विचार करत होतो की, जेव्हा माझे आईवडील हयात असणार नाहीत, तेव्हा माझे काय होईल. भिंतीवर टांगलेल्या एका ब्रशने मी ब्रश करीत असे. पण त्यासह रोजची अनेक कामे पार पाडणे म्हणजे माझ्या दृष्टीने एक कसरत होती. मी जेव्हा दहा वर्षाचा झालो,तेव्हा मी जीवही देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मला असे वाटत होते की माझ्या जीवनात आता कोणतेही ध्येय राहिले नाही. पण मी वेळेप्रमाणे पुढे जाण्यासही यातूनच शिकलो. जेव्हा ते १३ वर्षाचे झाले तेव्हा अपंग लोकांसंदर्भात एक लेख वाचला आणि शरीराच्या अपंगपणावर मात करून कसे पुढे जाता येते हे वाचायला मिळाले. मला असे वाटले की, मी दुसऱ्याचे प्रेरणास्थान बनावे यासाठीच लोकांनी मला असे बनविले असावे. तेव्हा जे नाही, त्यापेक्षा जे आहे याच्याच आधारे जीवन जगण्याचे ठरविले.  १९९० साली त्यांना ऑस्ट्रेलियन यंग सिटिझन पुरस्कार मिळाला.२००८ पासून जग हिंडू लागले.
 
बातम्या आणखी आहेत...