आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive: इरफानने उलगडले रहस्य, \'आईला आजही मी प्राध्यापक होण्याची प्रतिक्षा\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूरला आलेल्या इरफान खान यांनी भास्कर समूहाच्या ‘मंडे नो निगेटिव्ह’ अभियानाची स्तुती केली. ‘मंडे नो निगेटिव्ह’नुसार त्यांच्याच लेखणीतून जाणून घ्या त्यांच्या यशाची त्रिसूत्री...
अपयशाची काय भीती
मी आजही यशाने हरखून जात नाही. कारण, काळ कधीही बदलू शकतो. वाईट विचार आपल्याला संपवून टाकतात. मात्र, सकारात्मक विचारच आपली स्वप्ने जिवंत ठेवत असतात.

कंफर्ट झोनमधून बाहेर पडा
मी अभिनयासाठी मुंबईत आलो. मात्र, आधी मला जयपूरच्या कंफर्ट झोनमधून बाहेर पडायचे होते. नव्या वाटेवर स्वत:ला सिद्ध करायचे होते. एनएसडी शिकायला जातोय व प्राध्यापक बनून परतेन, असे तेव्हा आईला खोटे बोलून गेलो. ती अजूनही प्राध्यापक होण्याची वाट पाहतेय. चित्रपटांचा गंधच नसलेल्या वातावरणात माझे पालनपोषण झाले. माझी स्वप्ने मी दररोज जगत होतो म्हणूनच ती पूर्ण होऊ शकली.

बंधने तोडा
मी बालपणापासूनच लाजाळू आहे. मात्र, हा अडसर दूर करावा लागला. छंद असो की काम, मी त्यात बुडून जात असे. आजही अभिनय करताना जोपर्यंत पात्र पूर्णपणे समजून घेत नाही तोपर्यंत कशाचेच भान नसते. माझी प्रत्येक भूमिका मला व्यग्र ठेवते. त्यासाठी मी कधीच वेळापत्रक पाहत नाही. फक्त असते जिद्द आणि छंद.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, इरफानची कुटुंबियांसोबतची खास छायाचित्रे...