आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: कर्जमाफीवर \'स्वाभिमानी\'त मतभिन्नता: भीक नको भरपाई द्या- शेट्टी; सरसकट माफी नको- खोत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच विराेधी पक्ष सत्ताधारी पक्षाचे अामदारही अाग्रही असताना फडणवीस सरकारचा घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दाेन प्रमुख नेत्यांमध्येच मात्र मतभिन्नता दिसून येते.

राज्यात शेतकरी कर्जमाफीसाठी केवळ विराेधकच नव्हे, तर सत्ताधारी पक्षाचे नेतेही अाग्रही अाहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अापण या मागणीसाठी अनुकूल असल्याची भूमिका घेतली अाहे. अशा वेळी फडणवीस सरकारमधील घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दाेन प्रमुख शिलेदारांमध्ये मात्र टाेकाची मतभिन्नता दिसून येते. या संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी कर्जमाफीच्या मागणीसाठी अापल्याच सरकारविराेधात रस्त्यावर उतरले अाहेत, तर  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खाेत हे मात्र मात्र तत्काळ व पूर्णत: कर्जमाफीच्या मागणीवर फारसे अनुकूल नाहीत. या दाेन्ही नेत्यांशी ‘दिव्य मराठी’ने साधलेला संवाद.  

पुढील स्लाइडवर वाचा... खासदार राजू शेट्टी यांची आक्रमक भूमिका... कर्जमाफीची भीक नव्हे, तर सरकारने केलेल्या नुकसानीची भरपाई मागताेय​
बातम्या आणखी आहेत...