आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करबचतीसाठी करा गुंतवणूक नियोजन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्थिक वर्ष 2012 - 13 मार्चमध्ये संपणार आहे. दरवर्षी आपण करबचतीकरिता विविध गुंतवणूक पर्यायांच्या शोधात असतो. आयकर कायदा, 1961 च्या विविध तरतुदीनुसार 80 (सी), 80 (डी), 80 (जी), 80 (सी सी जी) असे विविध करबचतीसाठीचे कलम गुंतवणूकदारांना उपलब्ध आहेत. स्वत:च्या आर्थिक संपत्तीमध्ये करमुक्त वाढ करण्याकरिता आणि करबचतीकरिता या पर्यायांचा योग्य वापर करणे आपल्या फायद्याचे आहे. या करबचत कलमांचा आपण थोडक्यात आढावा घेऊ या.
अ) 80 (सी) : - आयकर कायद्याच्या या कलमाअंतर्गत एकादी व्यक्ती एक लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करून करवजावट मिळवू शकते या कलमाअंतर्गत येणारे गुंतवणूक पर्याय पुढीलप्रमाणे : -
1- भविष्य निर्वाह निधी (पी पी एफ, ई पी एफ) : रुपये एक लाखापर्यंत मर्यादा - दरवर्षी
2- आयुर्विमा : रुपये एक लाखापर्यंत गुंतवणूक पात्र, विमा संरक्षण गुंतवणुकीच्या दहा पट असणे आवश्यक आहे. एन्डोवमेंट, युलीप व इतर विमा योजना यात पात्र आहेत.
3- ई एल एस एस (इक्विटी लिक्ड सेव्हिंग स्कीम) : 80 (सी) कलमाअंतर्गत पात्र असलेले म्युच्युअल फंड या गुंतवणूक पर्यायात मोडतात. या गुंतवणुकीची कायमर्यादा कमीत कमी तीन वर्षांची असते.
4- मुदत ठेवी (एफ डी) : राष्ट्रीयीकृत बॅँकांमध्ये व इतर पात्र बॅँका व वित्तीय संस्थामध्ये पाच वर्षे कालमर्यादेकरिता केलीली गुंतवणूक 80 (सी) अंतर्गत पात्र आहे.
5-नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (एन एस सी) : विविध टपाल कार्यालयात एन एस सी आणि विविध पोस्टाच्या योजना 80 (सी) कलमाअंतर्गत एक लाख रुपयापर्यंतच्या गुंतवणुकीत पात्र आहे.
ब) 80 (डी) : या कलमांतर्गत आरोग्य विमा खर्चाकरिता येणारा खर्च रु. 15,000 पर्यंत करसवलतीसाठी पात्र आहे. त्याचबरोबर आई-वडिलांच्या आरोग्य विम्याकरिता अजून रु. 15,000 पर्यंत गुंतवणूक करवजावटीसाठी पात्र आहे व आई-वडील ज्येष्ठ नागरिक असल्यास रु. 20,000 पर्यंतची गुंतवणूक स्वत:च्या रु. 15,000 वर या कलमाअंतर्गत पात्र आहे. म्हणजे एकूण रु. 30,000 व ज्येष्ठ नागरिक (आई-वडील) असल्यास रु. 35,000 पर्यंतची गुंतवणूक 80 (सी) कलमांतर्गत करबचतीसाठी पात्र आहे.
क) 80 (जी) : या कलमांतर्गत रु. 50,000 पर्यंतची गुंतवणूक किंवा दान धर्मादाय विभागाने व आयकर विभागाने मान्यता दिलेल्या संस्थांमध्ये किंवा पंतप्रधान विकास निधीसारख्या फंडामध्ये दान केल्यास करबचतीसाठी पात्र आहे.
ड) 80 (सी सी जी) : या कलमाला राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग स्कीम असेही म्हणतात. या कलमांतर्गत ज्याचे उत्पन्न दरवर्षी दहा लाखापेक्षा कमी आहे, असे नवीन गुंतवणूकदार शेअर बाजारात रु. 50,000 पर्यंत गुंतवणूक करून रु. 25,000 पर्यंत करबचत करू शकतात. या योजनेअंतर्गत केंद्र शासनाने व सेबीने मान्यता दिलेल्या कंपन्यांमध्ये किंवा एक्स्चेंज ट्रेडेड फंडात (ई टी एफ) गुंतवणूक करणे आवश्यक आहे. या गुंतवणुकीची कालमर्यादा 3 वर्षे आहे.
अशाप्रकारे गुंतवणुकीच्या या उपलब्ध पर्यांयांचा वापर करून सर्वसामान्यांनी व पात्र व्यक्ती, संस्थांनी करबचत व आर्थिकवृद्धी करून घेतली पाहिजे. याकरिता आपल्या गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घेऊन गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर ठरू शकते.
chaitanyavwangikar@gmail.com
(लेखक हे संचालक स्ट्रॅटमॅन कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आहेत)