आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Iranian Film Maker Jafar\'s Film Panahichi Taxi In Berlian Film Festival

बर्लिन फिल्म फेस्टिव्हल, जाफरमधल्या अस्वस्थ कलाकाराचा विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सतत इराणविरोधी फिल्म बनवण्याचा आरोप ठेवत जाफरवर सिनेमाशी संबधीत काहीही करण्यावर 25 वर्षांची बंदी घालण्यात आलीय. पण तरीही हा माणूस सिनेमा जगतोय आणि सिनेमा बनवतोय. आणि सिनेमाबद्दलची तगमग जगाला समजावी म्हणून तो जगातल्या फिल्म फेस्टीवलमध्ये पाठवतोय. बर्लीन फिल्म फेस्टमध्ये इराणच्या जाफर पनाहीची टैक्सी (2015) ही फिल्म दाखवण्यात आली.
जागतिक सिनेमा पाहणाऱ्याला जाफर पनाही हे नाव तसं नवीन नाही. पण हा माणूस सिनेमाचं वेड आणि आपली कलाकृती जपण्यासाठी काय काय करतोय, हे पाहणं आणि अनुभवनं नवं आहे. बर्लीन फिल्म फेस्टमध्ये इराणच्या जाफर पनाहीची टैक्सी (2015) ही फिल्म दाखवण्यात आली. सतत इराणविरोधी फिल्म बनवण्याचा आरोप ठेवत जाफरवर सिनेमाशी संबधीत काहीही करण्यावर 25 वर्षांची बंदी घालण्यात आलीय. पण तरीही हा माणूस सिनेमा जगतोय आणि सिनेमा बनवतोय. आणि सिनेमाबद्दलची तगमग जगाला समजावी म्हणून तो जगातल्या फिल्म फेस्टीवलमध्ये पाठवतोय. कैद आणि त्याच्या सिनेमावर बंदी घातल्यानंतरची त्याची ही तिसरी फिल्म आहे. 2011 मध्ये इटस नॉट फिल्म ही फिल्म कान्स फेस्टीवल पर्यंत कशी पोचली हे आश्चर्य आहे. त्यानंतर गेल्या वर्षी क्लोज कर्टन ही फिल्म चांगली गाजली. बर्लीनमध्येच तिला सिल्वर बिअर पुरस्कार मिळाला होता. आता यावर्षी आलेली टैक्सी (2015) ही फिल्म जाफर पनाहीचा मास्टर स्ट्रोक आहे. त्या बंदी विरोधातला, त्या क्लिस्ट नियमांविरोधातला आणि सिनेमावरच्या प्रेमासाठीचा मास्टर स्ट्रोक. टैक्सीचा हिरो तो स्वता आहे.

सिनेमाची सुरुवात टैक्सीच्या पुढच्या काचेतून होते. समोर रोजचं तेहरान शहर दिसतंय. अगदी आपल्या पुणे मुंबई सारखं गजबजलेलं. इथं कुणाला कुणासाठी वेळ नाही जो तो धावतोय. प्रत्येकाची लगबग आणि टॅक्सी सुरु होते. ही शेअर टॅक्सी आहे. कुठलाही प्रवासी कुठे ही चढू शकतो. पहले दोन प्रवासी टैक्सीत चढतात. त्यांच्यात वाद सुरु होतो. चोरीला कसली शिक्षा द्यायला हवी. एक फ्रीलान्सर आहे. दुसरी मागे बसलेली शिक्षिका. त्याच्या मते चोरीला देहदंड म्हणजे फाशीच हवी. ती शिक्षिका असल्यानं तिचा कडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. ती याकडे मानवतेच्या दष्टीकोनातून पाहते.

चीन पेक्षा इराणमध्ये फाशी जास्त होतायत. हे थेट इराणच्या सरकार विरोधातलं स्टेटमेन्ट आहे. अगदी सहज आलेलं. टैक्सीत जाफरने कैमेरे लावलेत हे या दोघांना माहित नाही, यामुळंच ते एव्हढे सहज बोलू शकले. याचवेळी ड्रायविंग सीटवर बसलेला जाफर दिसतो.
त्यानंतर जाफरच्या या टैक्सीत जे प्रवासी बसतात ते सर्व इराणमधल्या खडतर आयुष्याचे अनुभव सांगतात.

गोल्ड फिश घेऊन बसलेल्या दोन बायका जाफरच्या व्हाईट बलूनची आठवण करुन देतात. पुढचे एक दोन प्रवाशी जाफरला ओळखतात. त्याच्याशी सिनेमाबद्दल गप्पा मारतात. जाफरच्या "क्रिमसन गोल्ड" सिनेमात एका पिज्जा डिलीवरी बॉयचा बैंक लुटण्याचा प्रयत्न आणि त्याची आत्महत्या दाखवली असली तरी इराणमध्ये सर्वसामान्यांचं जगणं कसं कठिण झालंय, यावर हा सिनेमा भाष्य करतो. म्हणूनच तो इराणमध्ये वादग्रस्त ठरला. टैक्सीत बसलेले प्रवासी क्रिमसन गोल्डबद्दल बोलतात. त्यावर आपलं मत मांडतात आणि सिनेमा कसं आपली बाजू मांडतो हे जाफरला सांगतात.

टैक्सीतली सर्वात महत्वाची प्रवासी आहे जाफरची पुतणी. तिला शाळेतून घेऊन जाण्यासाठीच तो टैक्सी घेऊन घराबाहेर पडलाय. ही टैक्सीत बसल्यावर या सात-आठ वर्षाच्या मुलीची बडबड सूरू होते. तिला शाळेत सिनेमा कसा करायचा हे शिकवलं जातंय.. हे सर्व या काकाला सांगायला ती सुरुवात करते. काका जाफरवर सिनेमा करण्याची बंदी आहे. याची तिला किंचितशी कल्पना आहे. पण ती का घातलेय. हे तिला माहित नाही. तिच्या सिनेमाचे विषय काय इराणच्या महिलांचे प्रश्न. मग ती आपल्याला काकाला प्रश्न विचारते अनैतिक वास्तववाद म्हणजे काय. जाफरकडे याचं उत्तर आहे ही आणि नाही ही. कारण इराणमध्ये नैतिकता सरकार ठरवतं.
टैक्सीत शेवटची प्रवासी आहे. जाफरची वकिल. 2011 मध्ये बनवलेल्या इटस नॉट अ फिल्म सिनेमात ज्या वकिलाचा जाफरला फोन येतो ना ती हीच वकिल.

जाफरवरची बंदीविरोधात ती उभी राहिली. तिनं जाफरची बाजू मांडली. पण सरकार तिच्याही मागे लागलं. अख्खं तेहराणचं बार काऊंसिल तिच्या विरोधात गेलं. त्याच्या.गप्पात ती म्हणते हे म्हणजे सरकार अगोदर तुम्हाला परदेशी एजन्ट ठरवतात, नंतर तुम्हाला अटक करतात, तुमच्यावर बंदी येते, मग जेव्हा तुम्ही जेल मधून बाहेर येता तेव्हा मात्र तुमच्या आजूबाजूचे लोकच सरकारची भुमिका पार पाडत असतात. ते खुप भयानक असतं. सतत तुमच्यावर नजर ठेवली जाते. ही सामाजिक कैद असते. जाफर हे अनुभवतोय.
गोल्ड फिश घेऊन जाणा-या महिलांचं पाकिट टैक्सीत पडतं. ते देण्यासाठी तो पुन्हा त्या ठिकाणी जातो जिथं त्यांना सोडलंय. पुतणीला घेऊन बाहेर पडतो. त्या दोघींना शोधायला..तेव्हढ्यात दोन पोलीस येतात. टैक्सीची काच फोडतात. कैमेरे उखडून टाकतात. आणि तो परत येण्यापुर्वीच पळून जातात. थिएटरमध्ये अंधार..

इथं पुन्हा जाफर प्रेक्षकांशी संवाद साधतो. मी कलाकार आहे. सिनेमा माझी कला आहे. कुठल्याही परिस्थितीत मी सिनेमा बनवणारच. भले त्यासाठी काहीही करावं लागलं तरी चालेल. या सिनेमात काम केलेल्यांची नावं नाहीत. कारण ती खरी इराण मधली माणसं आहेत.
बंदी असताना सिनेमा बनवणं आणि तो बर्लीनपर्यंत पोचवणं ही सिनेमासाठी कायपण हे ब्रीद घेऊन जगणा-या जाफरमधल्या अस्वस्थ कलाकाराचा विजय आहे आणि ती दाखवून सिनेमा या कलेला कुणी रोकू शकत नाही हे बर्लीनवाल्यांना दाखवून दिलंय..

पुढील स्लाईडवर वाचा, जाफरसाठी रिकामी खुर्ची....