आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वजन कमी करण्याचे उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अतिरिक्त वजनापासून मुक्ती मिळवण्यासाठी चांगल्या उपायांचा शोध कायम सुरू असतो. काही उपायांमध्ये ग्राहकांना असंतुलित आहार घेण्यासाठी प्रवृत्त केले जाते. अनेक प्रोग्रॅम्समध्ये एकसारखी पद्धत सांगितली जाते ती म्हणजे, वजन घटवण्यासाठी कॅलरीज कमी घेतल्या पाहिजेत. मात्र, त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. डायट प्रोग्रॅमधून अपेक्षित फरक न पडल्यास तो अर्ध्यावर सोडून दिला जातो. यामुळे नैराश्य येण्याची जोखीम वाढू शकते. डायट प्लॅनला सिद्धांताच्या आधारावर, दीर्घकालीन व कौन्सिलिंगद्वारे बदल केल्याविना तो उपयोगी ठरू शकत नाही.
परिणामकारक नसणा-या प्रोग्रामची माहिती जाणून घ्या
@ एका आठवड्यात अर्धा किंवा एक किलो वजन कमी करण्याचा दावा केला असेल.
@ मॅजिकल फूड्सबद्दल सांगितले असेल.
@ काही पदार्थ अजिबात न खाणे आणि काही जास्त खाण्यास सांगणे. मेनू प्लॅन खूप कडक असतो.
@ वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि जीवनशैली बदलण्याची आवश्यकता नाही.
@ आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ कोणताही शास्त्रीय आधार नसतो.
@ कुटुंब किंवा मित्रांसोबत जेवणास मनाई करणे.
@ वैयक्तिक गरजांकडे दुर्लक्ष करून एकसारखा डाएट प्लॅन देणे.
@ असे प्रोग्राम संपूर्ण आयुष्यभर स्वीकारणे कठीण असते.
चांगल्या वेट मॅनेजमेंट प्लॅनचे सिद्धांत
ताजी फळे, भाज्या, लो फॅट डेअरी आणि आवश्यक फॅक्ट्स खाण्यासाठी सांगितले जाते हे हेल्दी फूड होय. प्रोग्राममध्ये विविधता, लवचिकपणा आणि संतुलन असते. कोणत्या मोठ्या फूड ग्रुपचे पदार्थ खाण्यास मनाई केली जात नाही. आवडीचे पदार्थ वेळोवेळी खाण्यास सांगितले जाते. व्यायाम, वेट ट्रेनिंग, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि कार्यपद्धतीत बदल उदा: निरोगी जीवनशैलीच्या सवयीसाठी प्रोत्साहन देणारे असते. केवळ कॅलरीवर भर देत नाही तर ते आहाराची गरज पूर्ण करते. त्याची आखणी हेल्थ प्रोफेशनल्सच्या शिफारशींवर आधारलेले असते. डायट प्लॅन वैयक्तिक गरजेनुसार बनतो. यातून एक समान पद्धतीने वजन घटते. हे वजन दोन ते चार किलोपेक्षा जास्त वजन नसते.