आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजनाशिवाय वसले गाव, सुविधांबाबतीत शहरांपेक्षा पुढे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्रायलमधील मोशाव्ह नाहालल या गावातील शेती करणाऱ्या कुटुंबांनी हे गाव वसवले आहे. त्यांना ‘कोऑपरेटिव्ह अॅग्रिकल्चरल कम्युनिटी’ असेही म्हटले जाते. गावातील प्रत्येक कुटुंबाचे शेत आहे. गावात कोणतेही पीक झाले तरी आधी गावासाठी काढून ठेवले जाते. उर्वरित धान्य विक्रीसाठी वेगळी समिती स्थापन करण्यात आली आहे. विकासकामे करण्यासाठी आणि प्रशासकीय धोरणे राबवण्यासाठी गावाची वेगळी परिषददेखील आहे.
या गावाची स्थापना एखाद्या विशिष्ट वर्षात झाली, असे सांगता येत नाही. मात्र, अंदाजे १०० वर्षांपूर्वी लोक येथे येऊन राहू लागले. सप्टेंबर १९२१ मध्ये या गावात वसाहती बांधल्या जाऊ लागल्या, अशीही एक नोंद आहे. १९४८ मध्ये इस्रायलच्या स्थापनेनंतर गावातील लोकसंख्या झपाट्याने वाढू लागली. १९८६ पर्यंत इथे दीड लाख इस्रायली नागरिक राहू लागले. आता गाव एवढे सुसज्ज झाले आहे की दैनंदिन गरजेच्या सर्व वस्तू येथे मिळतात. आधुनिकतेच्या बाबतीत एखाद्या शहरापेक्षाही अधिक सुविधा येथे देण्यात आल्या आहेत. }this-is-galilee.com
बातम्या आणखी आहेत...