आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोकादायकः गुन्ह्यांमध्ये टॉप टेन शहरांत मुंबई, नागपूर देशात आघाडीवर, पुणे-औरंगाबादही अव्वल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- वर्षभरात गुन्ह्यांची सर्वाधिक नोंद झालेल्या देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये महाराष्ट्रातील चार शहरे आघाडीवर आहेत. केंद्रीय गृह खात्याच्या नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने नुकताच २०१५चा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार देशात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद दिल्लीत झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर मुंबई आणि आठव्या क्रमांकावर पुणे आहे. इतकेच नाही तर मुख्यमंत्र्यांचे नागपूर बलात्काराच्या नोंदींमध्ये देशात ५व्या क्रमांकावर, चोरीच्या गुन्ह्यांमध्ये देशात ६व्या क्रमांकावर आणि अवैध शस्त्रास्त्रांविरोधातील गुन्ह्यात १०व्या क्रमांकावर आहे. आहे. औरंगाबाद, वसई-विरार आणि नाशिक शहरांतील चोरीच्या गुन्ह्यांची संख्या देशात अव्वल आहे.

गेल्या वर्षी भारतात ४६ लाख ६६ हजार ९८३ तक्रारी पोलिसांकडे नोंदवण्यात आल्या. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे ४ लाख ९९ हजार ७१२ लेखी तक्रारी महाराष्ट्रात नोंदवण्यात आल्या. त्यानंतर ४ लाख २६ हजार ७२८ तक्रारी तामिळनाडूमध्ये आणि ३ लाख १६ हजार ५७८ तक्रारी गुजरातमध्ये नोंदविण्यात आल्या.

देशातील प्रमुख शहरांपैकी सर्वात जास्त म्हणजे २५ टक्के गुन्हे दिल्लीत शहरात (१ लाख ७३ हजार ९४७ केसेस) घडले आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर मुंबई आहे. मुंबईत वर्षभरात ४२ हजार ९४० गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यानंतर अनुक्रमे बंगळुरू (३५,५७६), इंदूर (१८ हजार ४६३), पाटणा (१६ हजार ६७१), अहमदाबाद (१५ हजार ९६४), तिरुवनंतपुरम (१५,४१५) यांचा क्रमांक लागतो. त्यानंतर पुण्याचा (१५,३४९) क्रमांक लागतो.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, कोठे कीती झाले खून... कोणत्या गुन्ह्यात कोणते शहर आघाडीवर... आणि वाचा, काय आहेत कारणे... काय म्हणतात माजी पोलिस महासंचालक
बातम्या आणखी आहेत...