आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वकील, डाॅक्टर, प्राध्यापिकांनाही अात्महत्येचे विचार, ६०० महिलांनी बोलून दाखवली घुसमट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मधुरिमा पुरवणीत दिलेल्या महिला समुपदेशकांच्या मोबाइल क्रमांकावर काॅल सुरूच आहेत. यातून महिलांमध्ये आत्महत्येचा विचार येण्यामागची काही कारणे समोर आली ती अशी -
दै. ‘दिव्य मराठी’च्या मधुरिमाकडे ६०० महिलांनी घुसमट बोलून दाखवली, नोकरदार महिलांच्या छळाचे प्रमाण अधिक
महिला आयोगाची लवकरच स्वतंत्र हेल्पलाइन
महिलांचेएकटेपण वाढत असल्याचे लक्षात येत असून, सामान्य नोकरदार महिलांच्या मनातील घुसमट बाहेर यावी यासाठी राज्य महिला आयोग लवकरच स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करणार आहे. त्यासाठी आम्ही तज्ज्ञांची बैठकही घेतली आहे. केवळ संकटात असलेल्या महिलांना यातून मदत होईल. हेल्पलाइनच्या काॅल सेंटरमध्ये प्रशिक्षित महिला कर्मचारी असतील. महिलांना त्या दिलासा देतील, मार्गदर्शन करतील. हेल्पलाइन क्रमांक टोल फ्री ठेवण्याचा विचार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंबंधीचा प्रस्ताव येत्या अधिवेशनात मंजूर करण्याची ग्वाही दिली आहे. -विजया रहाटकर, अध्यक्ष, राज्य महिला अायाेग

औरंगाबाद परिसरातून सर्वाधिक फोन
औरंगाबादपरिसरातून मला सर्वाधिक फोन आले. नाशिक, जळगाव, धुळे, सोलापूर, अकोला आदी भागांतूनही मोठ्या संख्येने फोन आले. नवऱ्याचा बाहेरख्यालीपणा, सासरी होणारे अत्याचार यामुळे हतबल महिलेचे विचार तिला आत्महत्येकडे नेणारेच होते. मनमोकळा संवाद साधल्यानंतर दुसऱ्याच दिवशी याच महिलांनी पुन्हा फोन करून “तुमच्याशी बोलल्याने मन मोकळे झाल्यासारखे वाटते आहे,’ असेही सांगितले. एकंदर महिलांना व्यक्त होण्यासाठी सक्षम व्यासपीठ नसल्याचीच उणीव जाणवली. सायलीपाध्ये-पराडकर, मॅरेज अॅण्ड बिहेविअर काैन्सिलर

नाशिक
सुशिक्षितमहिलांच्या आत्महत्यांचे प्रमाण बळावल्याची चर्चा औरंगाबादेतील रसिका फड यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर चर्चिली गेली. "दिव्य मराठी'च्या मधुरिमा पुरवणीत यावरील लेखात (२१ जून) काही समुपदेशकांचे क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले होते. मागील १२ दिवसांत या समुपदेशकांजवळ सुमारे ६०० महिलांनी आपला कोंडमारा स्पष्ट केला. धक्कादायक म्हणजे यातील बहुतांश महिलांनी मनात आत्महत्येचे विचार वारंवार येत असल्याचे नमूद केले. विशेष म्हणजे काॅल करणाऱ्यांत प्राध्यापक शिक्षक, वकील, डाॅक्टर अाणि इतर क्षेत्रांतील उच्चशिक्षित महिलांचे प्रमाण सर्वाधिक हाेते.

पतीकडून मारझोड
नवराराेज दारू पिऊन मारताे. अाई-वडिलांना सांगितले तर ते दु:खी हाेतात. परंतु यातून मार्ग निघत नाही. अात्महत्या करण्याचा विचार मनात येताे.

वृद्धाश्रमात जाणे नको
तळहाताच्या फाेडाप्रमाणे वाढवलेल्या मुलांनी मोठे होताच ‘गुण’ दाखवणे सुरू केले. आता ते मला वृद्धाश्रमात टाकायचे म्हणतात. तेथे राहण्यापेक्षा जीवन संपवलेलेच बरे.

पती निधनानंतर होणारी फरपट
पतीच्यामृत्यूनंतर मी एकटी पडले आहे. मुलांना वाढवताना माेठीच तारेवरची कसरत करावी लागते. असलं जगण्यापेक्षा मेलेलं बर असं वाटतंय...

पती बाहेरख्याली
माझा नवरा दुसऱ्या बाईच्या नादी लागला अाहे. मला घराबाहेर काढण्याचा त्याचा प्रयत्न आहे. हरतऱ्हेचे प्रयत्न केले, पण मला यश येत नाही. आत्महत्येशिवाय दुसरा पर्यायच दिसत नाही.
भावना दाबून ठेवण्यामुळे नैराश्य
गृहिणीअसो किंवा नोकरदार महिलेच्या आयुष्यात मानसिक तणाव नैराश्याची मुळे खोलवर रुजलेली आहेत हे या काॅल्सवरून लक्षात आले. समाजात होणारा भेदभावपूर्ण व्यवहार, कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक अत्याचार यामुळे सर्वच वयोगटातील महिला अक्षरश: त्रस्त आहेत. पण मनातील भावना ओठावर येऊ देत नसल्याने त्यांची वेदना इतरांना जाणवत नाही. भावनांचा असा कोंडमारा होत असल्याचे नैराश्य बळावते आहे. डाॅ.नीलम मुळे, संचालिका, संवाद कन्सल्टन्सी

नोकरदार महिलांना छळाची झळ
विद्यार्थिनींपासूनडाॅक्टरांपर्यंत काॅल आले. यात सुशिक्षित महिला अधिक होत्या. गृहिणींच्या तुलनेत नोकरदार महिलांना अधिक प्रमाणात पती कौटुंबिक वादांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शहरांतील नोकरदार महिलांमध्ये मानसिक ताण नैराश्य जास्त प्रमाणात दिसते. सासरी होणारा अत्याचार, कुटुंबीयांचे आपल्या करिअरकडे दुर्लक्ष, मिळणारी दुय्यम वागणूक अशा कारणांनी नैराश्य येते. आजही रोज ३० ते ४० महिलांचे काॅल येत आहेत. मधूचाैगावकर, संचालिका, पाठिंबा संस्था

कौटुंबिक छळापायी सरकारी नोकरी करणाऱ्या रसिका फड या महिलेने औरंगाबादेत आत्महत्या केली. एमए इंग्लिश, एलएलबी झालेल्या रसिका यांच्या आत्महत्येनंतर ‘दिव्य मराठी’च्या मधुरिमा पुरवणीत (मंगळवार, २१ जून) ‘रसिकाला वाचवायलाच हवं’ या मथळ्याखाली ‘कव्हर स्टाेरी’ प्रसिद्ध केली होती. त्यात डाॅ. नीलम मुळे, मधू चाैगावकर अाणि सायली पाध्ये-पराडकर या समुपदेशकांचे माेबाइल क्रमांक देण्यात आले होते. पहिल्याच दिवशी या समुपदेशकांना प्रत्येकी दीडशे ते दोनशे काॅल आले. अजूनही असे काॅल येत आहेत. या महिलांशी संवाद साधल्यानंतर समुपदेशकांना काही बाबी प्रकर्षाने लक्षात आल्या. त्यानुसार बहुतांश सुशिक्षित महिलांना व्यक्त होण्याची संधीच मिळत नाही. अनेक जणींना एकाकीपणा खायला उठतो. आई-वडिलांकडे व्यथा सांगावी तर त्यांना दु:ख होईल अशी कोंडीही अनेकींची असते. त्यामुळे मुकाटपणे अत्याचार सहन करण्याचा मार्ग त्या स्वीकारतात. काहींना मानसिक आजाराने ग्रासल्याने त्यांच्यात नैराश्य आले आहे.
बातम्या आणखी आहेत...