आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ई-मेलला कधीच उत्तर देत नाही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची कन्या, अशी आहे लाइफस्‍टाइल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इव्हांका ट्रम्प - Divya Marathi
इव्हांका ट्रम्प

व्हांका आठ वर्षांची असताना  आई इव्हानासोबत न्यूयॉर्कच्या प्लाझा हॉटेलमध्ये जात होती. आई कंत्राटदाराला काही निर्देश देत असे तेव्हा इव्हांका खूप काळजीपूर्वक ऐकत असे. आई एका एका इंचाचे काम पाहत असे. इव्हांकासाठी अशा साइट्स  खेळण्या-बागडण्याचे ठिकाण होते. मात्र, आईसाठी तो व्यवसाय होता. आई दररोज इव्हांका व त्याच्या भावासोबत नाष्टा करत असे. एवढ्या वर्षांनंतर जेवढी ऊर्जा आईत होती तेवढी ती आपल्यात  नाही, अशी इव्हांकाची भावना आहे. इव्हांका ट्रम्प ऑर्गनायझेशनची उपाध्यक्षा आहे.  


वुमन हू वर्क

‘रिरायटिंग द रुल्स फॉर सक्सेस’ या पुस्तकात इव्हांकाने हे मनोगत व्यक्त केले आहे. ज्या काळात डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची तयारी करत होते तेव्हा इव्हांकाने हे पुस्तक लिहिले. तिने २००७ मध्ये आपले ज्वेलरी कलेक्शन लाँच केले. व्यावसायिक महिला किंवा करिअरला महत्त्व देणाऱ्या महिला दागिन्यांमध्ये कमी रस दाखवतात, असे काही काळानंतर इव्हांकाच्या लक्षात आले. यामध्ये महिलांच्या हँडबॅग, सँडल्स व लाइफटाइल्सच्या अन्य वस्तू त्यांनी  सादर केल्या. आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ती प्रत्येक प्रकारच्या लोकांशी चर्चा करते. विशेषत: कॉर्पोरेट संस्कृतीतील बहुतांश लोकांशी चर्चा करून फॅशन ब्रँडचा लौकिक वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. व्यवसायात लक्ष घालणाऱ्या इव्हांकाला सकाळी व संध्याकाळी पती व मुलांसोबत फिरायला आवडते. महाविद्यालयीन जीवनात पहिल्यांदाच चार वर्षे एका गुंतवणूक बँकरशी डेटिंग केली. यानंतर अन्य एकाशी व २००५ मध्ये जरेद कुशनरशी डेटिंग केली. २००८ मध्ये जरेदचे आई- वडील या नातेसंबंधाबाबत समाधानी नव्हते. त्यामुळे दोघे विभक्त झाले. मात्र, त्यानंतर २००९ मध्ये त्यांनी लग्न केले. या दांपत्याला एक मुलगी व दोन मुलगे आहेत.  


इव्हांका कार्यालयात आल्यानंतर  सर्वात आधी एक मोठा कप कॉफी पिते. यासोबत दिवसभरात करावयाच्या कामाबाबत टिपण काढत असते. सहकाऱ्यांसोबत बैठक घेतल्यानंतर पुन्हा ट्रम्प प्राॅपर्टीजच्या साइट्सचा दौरा करण्यास निघते. ती ई-मेल्सला कधीही उत्तर देत नाही. तसेच कोणतेही काम घरी घेऊन जात नाही. मात्र, त्याचबरोबर  वडिलांचे खूप महत्त्वाचे काम असेल तर मुले झोपल्यानंतर काम आटोपते.

 

पुढील स्‍लाईडवर वाचा, इव्हांका ट्रम्प विषयी... 

बातम्या आणखी आहेत...