आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनाचा आनंद लुटण्यासाठी निरर्थक, तथ्यहीन गोष्टींकडे द्या जाणीवपूर्वक लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मी जे काही शिकले ते शेअर करण्याचा निर्णय मी घेतला आहे. अपयशाचे फायदेदेखील सांगेन. केव्हा केव्हा याला वास्ताविक जीवनही म्हणता येईल. 21 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या वेळी मी पदवी घेत होते. माझी काही महत्त्वाकांक्षा होती. परंतु मी निश्चित कादंबरी लिहिण्यासंदर्भात निर्णय घेऊ शकत नव्हते. माझे आई-वडील खूप गरीब होते. कधी कॉलेजला गेले नव्हते. त्यांना वाटत होते माझा लेखक बनण्याचा विचार अवास्तव आहे. त्यामुळे माझ्या उपजीविकेचा प्रश्न सुटणार नव्हता. त्यांचा विचारही योग्य होता. गरिबीशी त्यांचे द्वंद्व सुरू होते.
गरिबी ही भीती आणि तणाव निर्माण करीत असते. त्यामुळे कधी-कधी नैराश्यही येते. परंतु मला गरिबीची भीती वाटत नव्हती, मला अपयशाची भीती वाटत होती. अपयशाची भीती यशाच्या इच्छेसारखीच प्रभाव तुमच्यावर दाखवते.
पदवी घेतल्यानंतर सात वर्षांनी माझ्या जीवनात अपयशाने पाऊल ठेवले. माझे वैवाहिक जीवन जास्त काळ चालले नाही आणि मी बेरोजगार होते. एकटे आई-वडील आणि राहायला घर नाही अशी परिस्थिती होती. माझे आई-वडील माझ्यासाठी चिंताग्रस्त होते. जीवनातील सर्वात मोठे अपयश माझ्यासमोर होते. जीवनच अंधारमय वाटत होते. काही मार्ग सापडत नव्हता. वास्तविकतेपक्षा खूप लांब आशेचा एक किरण दिसत होता. त्या वेळी मी माझी सर्व ऊर्जा त्या कामात लावली. ज्यामुळे मला फायदा होत होता. मी स्वतंत्र होते. कारण सर्वात मोठी भीती संपली होती. जीवनात काही अपयश मोजता येत नाही. परंतु अपयशामुळे जीवन जगता येणेही अशक्य होते.
अपयशाने मला आंतरिक सुरक्षा दिली. ही सुरक्षा मला परीक्षा उत्तीर्ण होतानाही मिळाली नव्हती. अपयशाने मला अनेक गोष्टी शिकवल्या. अपयशात मिळालेल्या ज्ञानाने मी अधिक बलशाली झाले. अपयश आले नाही तर स्वत:ला ओळखताही येणार नाही. अपयशात मिळालेले ज्ञान सर्वात मोठे गिफ्ट आहे. संकटांना सामोरे जाऊन मिळालेल्या विजयाची किंमत आहे. जीवन यशाचे चेकलिस्ट नाही, हे आपण समजून घेतले
पाहिजे. तुमचे क्वालिफिकेशन, सीव्ही म्हणजे जीवन नाही, हे मी अपयशातूनच शिकले.