आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॅकी चेनचे सर्वाधिक स्टंट; तीन वेळा नाक, दोन वेळा गालाचे हाड, तर एकदा कवटी तुटली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॅकी चेन गरिबीत राहिले आणि वाढले. चित्रपटात त्यांनी लोअर क्लास स्टंटमन पासून सुरुवात केली आणि चित्रपट निर्मितीच्या अनेक क्षेत्रात मोठे कौशल्य मिळविले. इतके की त्यांनी आपल्या चायनीज जोडिएकमध्ये १५  महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. यात निर्मितीप्रमाणे अभिनय, दिग्दर्शन,  फाइट कोरियोग्राफर, कम्पोजर या भूमिकांचाही समावेश आहे. कोणत्याही चित्रपटामध्ये त्यांना विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्याबद्दल त्यांची नोंद २०१२ मध्ये गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली हाेती. त्यांचे नाव  "मोस्ट स्टंट बाय अ लिव्हिंग अॅक्टर च्या   गिनीज रेकॉर्डमध्येही आहे. पण या स्टंटमध्ये त्यांना काही वेहा अपयशही आले. तीन वेळा नाक, दोन वेळा गालाचे हाड, जवळ जवळ सर्व बोटे चित्रीकरणादरम्यान तुटली आहेत आणि कवटीला फ्रॅक्चरही झाले. हा संघर्ष लहानपणापासून सुरू आहे.  हाँगकाँगमध्ये १९५४ मध्ये जन्मलेल्या जॅकीचे नाव पालकांनी ठेवले होते, चान काँग-सांग. याचा अर्थ आहे हाँगकाँगमध्ये जन्म झालेला. त्याचे वडील फ्रेंच दूतावासात स्वयंपाकी होते आणि आई हाउसकीपर. जॅकी जेव्हा सात वर्षाचा होता तेव्हा, वडिलांना अमेरिका दूतावासात प्रमुख स्वयंपाक्याचे काम मिळाले. पण हे काम ऑस्ट्रेलियात होते.  वडिलांना वाटले की, जॅकीने हाँगकाँगमध्येच रहावे . म्हणून त्याला वडिलांनी  चायना ड्रामा अकादमीमध्ये भरती केले. तेथे त्याने दहा वर्षात  मार्शल आर्ट््स, अॅक्राेबेट, गाणे आणि अभिनय शिकला. तेथे कडक शिस्त होती. चूक झाल्यास मार बसायचा. 

आठ वर्षाचे असताना त्यांना एका केंटोनिज चित्रपटात काम मिळाले. मी फार आनंदित झालो असे जॅकीने एका मुलाखतीत सांगितले. कारण चित्रपटाच्या सेटवर चांगला लंच बॉक्स मिळत असे. शाळमध्ये मोठ्या मुलांशी भांडणे होत असत. ते वयाच्या सतराव्या वर्षी चायना ड्रामा अकादमीतून ग्रॅज्युएट झाले. पण तोपर्यंत चिनी ऑपेराची लोकप्रियता संपली होती.  यासाठी काम शोधणे आवश्यक होते. हे फार अवघड होते. कारण ड्रामा स्कूलमध्ये त्यांना इतके लिहायला वाचायला शिकविले नव्हते. तेव्हा  स्टंटमन बनणे हेच एक काम राहिले होते. एका मुलाखतीत जॅकीने सांगितले की, वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी लोअर क्लास स्टंटमनचे काम सुरू केले. गर्दीत उभे राहून मार खाणे हे काम असायचे. 

यानंतर ते  मीडिल क्लास स्टंटमन झाले. त्यावेळी स्टंटमन बनण्याचे स्वप्न होते. काम केल्यानंतर ते डायरेक्टरच्या मागे उभे राहून त्याच्या कामाची पद्धत पाहत असत. कॅमेरामनवर ते विशेष लक्ष ठेवायचे. कधी कधी कॅमेरातून पाहायला मिळावे, यासाठी ते कॅमेरामनला सिगरेट किंवा कॉफी देत असत. अशा पद्धतीने त्यांनी कॅमेरामन असिस्टंंटचे काम मिळविले. यात त्यांना कॅमेरा उचलून नेण्याचे काम मिळाले.  पण हाँगकाँग फिल्म इंडस्ट्रीची स्थितीही खराबच होत गेली आणि त्यांना कामेही मिळणे बंद झाले. यासाठी आईवडिलंाकडे म्हणजे ऑस्ट्रेलियात जावे लागले.  एक रेस्टॉरंट आणि एका बांधकाम साइटवर काम मिळाले. तेथे त्यांना जॅकी हे नाव मिळाले. जॅक नावाच्या कामगाराला त्यांचे  कँाग -सांग उच्चारण्यास अडचण पडत असे. म्हणून तो त्याला लिटिल जॅक नावाने हाक मारत असे. यानंतर त्यांना एक दिवस टेलिग्राम आला. प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक  लो वाई यांनी जॅकीला स्टंट करताना पाहिले होते म्हणून ते प्रभावित झाले हाेते. जॅकीला घेऊन त्यांना एक चित्रपट करायचा होता.  अशा प्रकारे ते पुन्हा हाँगकाँगमध्ये आले. वयाच्या २१ व्या वर्षी हीरो म्हणून "न्यू फिस्ट अँड फ्यूरी' चित्रपट रिलिज झाला. पण तो लोकप्रिय झाला नाही. पुढे त्यांनी मार्शल आर्टमध्ये कॉमेडी सुरू केली आणि मग मागे वळून पाहिले नाही. 
बातम्या आणखी आहेत...