Home | Divya Marathi Special | jaipal reddy in trouble

जयपाल रेड्डी यांचे पद धोक्यात

दिव्य मराठी नेटवर्क - दिल्ली | Update - Jun 03, 2011, 05:49 PM IST

दिल्ली कॅबिनेटमधून जयपाल रेड्डींची खुर्ची याआधी जाता जाता राहिली; पण आता त्यांच्या पदाला पुन्हा एकदा घरघर लागली आहे.

  • jaipal reddy in trouble

    दिल्ली कॅबिनेटमधून जयपाल रेड्डींची खुर्ची याआधी जाता जाता राहिली; पण आता त्यांच्या पदाला पुन्हा एकदा घरघर लागली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्रिपद रेड्डींनी नाकारल्यामुळे पक्षाचा आदेश पाळला नसल्याचे मानले गेले. जयपाल रेड्डींना दिल्ली सोडून आंध्रचे मुख्यमंत्रिपद नको आहे. जयपालांऐवजी आता आंध्रचा कारभार किरण रेड्डींकडे सोपवण्यात आला आहे. मात्र, आता जयपाल रेड्डींची दिल्लीतली खुर्ची डगमगत आहे. जयपाल रेड्डी हे तेलंगणा समर्थक मानले जातात. हेच कारण पुढे करून काँग्रेस त्यांना केंद्रातून काढण्याचा विचार करत आहे. पण, जयपालांना राज्याच्या राजकारणात रुची राहिलेली नाही. आगामी काळात होणा:या मंत्रिमंडळातील फेरबदलांत जयपाल रेड्डींचे पद काढून घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    काही काँग्रेसवाल्यांचं तर असं मत आहे की, चमत्कार झाला तरच जयपाल रेड्डींची दिल्लीतली खुर्ची वाचेल. आता पाहूया, जयपाल रेड्डींचे नशीब त्यांना दिल्लीत ठेवते की राज्यात धाडते...

Trending