आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानमध्ये पोलिसांकडून विदेशींना मार्शल आर्टचे धडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जपानमध्ये विदेशी पर्यटकांना नवनवीन सुविधा देऊन आकर्षित केले जात आहे. इंग्रजी भाषेत मार्गांचे संकेत दर्शवल्यानंतर आता तेथील शिमाने राज्यातील पोलिसांनी नवाच प्रयोग केला आहे. तेथे  विदेशी नागरिकांना मार्शल आर्टचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे जपानी पोलिस अधिकाऱ्यांना इंग्रजीचे प्रशिक्षणही दिले जाईल तसेच विदेशी नागरिकांचा विश्वासही जिंकता येईल. 
 
मागील काही दिवसांमध्ये असे दिसून आले की, कुणी विदेशी नागरिकाने पोलिस अधिकाऱ्यांना मदत मागितली असता ते काहीच समजू शकत नव्हते. यामागे भाषेचा अडथळा हे एकमेव कारण होते. स्थानिक जपानी नागरिकांबद्दल विदेशींमध्ये काही गैरसमज निर्माण होऊ नये, यासाठीदेखील हा उपक्रम राबवला जाणार आहे.  
 
मार्शल आर्ट ही जपानची एक प्राचीन कला आहे. जगभरात तिचा लौकिक आहे. प्रशिक्षणाची तयारी सुरू झाली असून पोलिस अधिकारीही दररोज सराव करत आहेत. या प्रशिक्षणात जपानी नागरिक आणि पोलिस अधिकारी टुरिस्ट फ्रेंडली आहेत, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. 
बातम्या आणखी आहेत...