आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यामागील : कोहली, क्रिकेट आणि अनुष्का...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या न्यूयॉर्कमध्ये सुटी घालवत आहेत. त्यांचे प्रेमप्रकरण जगजाहीर अाहे. दोघेही आपापल्या कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कामामुळे ओळखले जातात. भारतातील ग्रामीण भागात दोन वेगवेगळ्या जातींतील प्रेमीयुगुलांना जिवे मारण्यात येते. या घाणेरड्या कामाला ऑनर किलिंग म्हटले जाते. आपल्या येथे प्रत्येक पावलावर वेगवेगळे नियम-कायदे ठरवण्यात आले आहेत. यावर राज कपूरने एक चित्रपट बनवला होता प्रेमरोग. सुपरस्टारच्या जगतात ऑनर किलिंगसारखे प्रकार घडत नाहीत. पंजाबी खेळाडू आणि ब्राह्मण अभिनेत्रीच्या प्रेमप्रकरणाला कोणी विरोध करणार नाही. 
 
काही दिवसांपूर्वी विरोट कोहलीने कमी धावा काढल्या होत्या. तेव्हा काही बेजबाबदार पत्रकारांनी अनुष्का शर्माला दोषी ठरवले होते. प्रत्येक क्रिकेट खेळाडूच्या जीवनात अपयश येत असते. यशाचा काही राजमार्ग नसतो. ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणाऱ्या बॉलला सोडून देणे किंवा व्यवस्थित खेळण्याचे कौशल्य विराटने आत्मसात करायला हवे. प्रत्येक फलंदाजाला अशा प्रकारच्या चेंडूचे आव्हान असते. लांगुलचालन करणारे पंच असल्यावर खेळणे अवघड होते. 
 
असो, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना आता थोडी उसंत मिळाली असेल. अशा प्रकारे सुटी घालवल्यामुळे शरीरात एक नवी ऊर्जा निर्माण होते. आवडते काम केल्याने कधीच थकवा जाणवत नाही. मात्र, आपल्या येथे पालक मुलांना आवडते काम करू देत नाहीत. खेळाडू अंधश्रद्धेवरही विश्वास ठेवतात. जे कपडे घालून शतक ठोकले जातात, तेच कपडे ते धुऊन घालत असतात. ज्या देशावर ब्रिटिशांचे साम्राज्य होते त्याच देशांमध्ये क्रिकेट लोकप्रिय झाले आहे. चीनमध्येदेखील या खेळावर आता लक्ष केंद्रित केले जात असल्याची चर्चा आहे, कारण यात जास्त पैसा आहे. प्रत्येक क्षेत्रात अर्थशास्त्र महत्त्वाचे झाले आहे. 
 
पॉली उम्रीगर यांच्या काळात कपडे धुण्यासाठी भत्ता मिळत होता, मात्र पाचव्या दिवशी पैसे मिळत नव्हते. सध्या सगळ्यात जास्त पैसा क्रिकेट नियामक मंडळाकडे आहे. यातील काही पैसा इतर खेळावर त्यांना खर्च करायला हवा. विराटसारख्या श्रीमंत खेळाडूने एखादी कबड्डी टीम विकत घ्यायला हवी. 
 
अनुष्का शर्माला आदित्य चोप्राने पहिली संधी दिली होती. त्यांनी एनएचटेन नावाचा चित्रपट बनवला होता. मात्र, फिल्लोरीमध्ये त्यांना यश मिळाले नाही. अनुष्का वेळ काढून काही चित्रपटांच्या स्क्रिप्ट वाचत आहे. प्रियंका चाेप्रा आणि दीपिका पदुकोन यांना चित्रपट निर्मितीची आवड आहे. दीपिकाचे वडील बॅडमिंटनपटू आहेत. ती त्यांच्यावर बायोपिक बनवू शकते. एमएस धोनीच्या बायोपिकला कमी यश मिळाले होते. भारतात क्रिकेट आणि चित्रपट एका नशेसारखे आहेत. शेवटी एका चांगल्या चित्रपटाची आशा केली जाऊ शकते. लव्ह मॅरेजमध्ये देवआनंद यांनी एका क्रिकेट खेळाडूची भूमिका केली होती. एकेकाळी सामाजिक कार्यासाठी पैसा गोळा करण्यासाठी दिलीप कुमार, देव आनंद आणि राज कपूर क्रिकेट मॅचचे आयेाजन करायचे. अशा मॅचमध्ये नायिकेच्या बॉलवर फलंदाज विकेट घेताच आऊट व्हायचे. दिलीप कुमार आणि राज कपूर या दोघांनाही नर्गिस आणि वैजयंतीमालाविषयी आकर्षण होते. सध्या दिलीप कुमार स्मरणशक्ती गमावून बसले आहेत. अशा प्रकारच्या अर्थ नसलेल्या बातम्या काही दिवसांपासून येत आहेत. 

jpchoukse@dbcorp.in