आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सब्जेक्ट नॉलेजच नव्हे तर स्टाइलसाठी जगभर प्रसिद्ध- जॅनी मिंटन बेडोज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पदवी शिक्षण घेत असताना बेडोज यांना काही काळ पोलंडच्या मिनिस्टरी ऑफ फायनान्समध्ये सल्लागार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. भरपूर वाव असल्यामुळे पदवी शिक्षणानंतर लगेच आंतररराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये अर्थतज्ज्ञ म्हणून रुजू झाल्या. आफ्रिकेतील मायक्रो इकोनॉमिक्स अॅडजस्टमेंट प्रोग्राम आणि पूर्व युरोपमध्ये ट्रान्झिशन इकोनॉमीज अशी जबाबदारी त्यांच्याकडे होती.
काही काळ तिथे काम केल्यानंतर त्यांनी १९९४ मध्ये द इकोनॉमिस्टमधील नोकरी स्वीकारली.
त्यांना लंडनमधील इमर्जिंग मार्केट पाहण्यास सांगण्यात आले. कामाच्या आवाक्यामुळे त्या दोन वर्षांतच इकोनॉमिक एडिटर झाल्या. त्यामुळे त्यांच्यावर बिझनेस, फायनान्स, इकोनॉमिक्स, सायन्स आणि टेक्नॉलॉजी आदी विषयांची जबाबदारी आली. अमेरिकी अर्थशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय वित्त धोरणात त्यांना गती आहे. त्या या विषयावर संपूर्ण जगात लेक्चर आणि सेमिनार देत असतात. कार्नेगी एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीसच्या ट्रस्टी आणि आर्थिक विकासासाठी स्थापन संशोधन सल्लागार मंडळाच्या सदस्यही आहेत. ४७ वर्षीय बेडोज १७ व्या एडिटर -इन-चीफ होणार आहेत. त्यांच्यावर नवी जबाबदारी सोपवताना द इकोनॉमिस्ट ग्रुपचे चेअरमन रुपर्ट पेनेंट रिआ म्हणाले, जॅनी द इकोनॉमिस्टसाठी सर्वात यशस्वी ठरतील. त्या मॅगझिनची मूल्ये पुढे नेतील. नऊ वर्षांपासून संपादक राहिलेल्या जॉन माइक्लेथवेट यांची त्या जागा घेतील. बेडोज आपल्या टीममध्ये आणि सोबत काम करणाऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत. टीममधील सदस्य मोल एकदा म्हणाले होते, बेडोज खूप बुद्धिमान आहेत. अर्थशास्त्राचा त्यांचा गाढा अभ्यास आहे.
याशिवाय त्यांच्याशी कोणत्याही विषयावर चर्चा केली तरी समोरचा निष्प्रभ होतो. त्यांचे लॉजिक मजबूत असते. एवढेच नव्हे तर त्यांचे ड्रेसिंग सेन्स आणि स्टाइल वेगळी असते. त्या ग्लॅमरस आहेत. त्या लॅपर्ड प्रिंटच्या हाय हिल घालून कार्यालयात येतात तेव्हा कर्मचारी त्यांच्याकडे पाहतच राहतात. त्या कामासाठी जेवढा वेळ देतात त्याच प्रमाणात स्वत:चीही काळजी घेतात.