आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • John Chambers Article About Leadership, Divya Marathi

मोठे बदल आणि चांगल्या आयुष्यासाठी नेत्याला दूरदृष्टी नितांत गरजेचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुढील दहा वर्षांत 10 कोटी भारतीय ग्रामीण भागातून शहराकडे येतील. त्या वेळी देशातील 6 लाख 40 हजार गावांमध्ये 83.30 कोटी नागरिक राहतील. पुढील 20 वर्षांत शहरात वाढणाया लोकसंख्येसाठी 90 कोटी वर्गमीटर जागेची गरज असेल. इतक्या मोठ्या प्रमाणावर होणाया शहरीकरणाचा परिणाम पर्यावरणावरही होईल. जगातील मोठ्या लोकशाही राष्‍ट्रांत बदल धिम्या गतीने होतात; परंतु भारतातील नागरिक मेहनती असल्याने ते आपल्या समस्यांचा योग्य पद्धतीने उपाय शोधतात. ऊर्जेचा अधिक वापर वापरामुळे कार्बनचे उत्सर्जन अधिक होत आहे. पाण्याची समस्या देशात गंभीर होत आहे.‘लीडरशिप इन एनर्जी अँड एन्व्हायरमेंटल डिझाइन’ (एलईईडी) सारखे मानक वापरल्यास या दोन्ही समस्या दूर करता येतील. भारतात सिस्कोच्या कार्यालयात एलईईडीसारखे मानक आधीपासून वापरले जात आहेत. त्यामुळे अमेरिकेतील कार्यालयांपेक्षाही भारतातील कार्यालयांमध्ये कमी ऊर्जेचा वापर होतो.
भारतासमोर दुसरे आव्हान वाहतुकीचे आहे. 2020 पर्यंत वाहनांची संख्या पाच पटींनी वाढणार आहे. देशातील महामार्ग दरवर्षी चार टक्क्यांनी वाढत आहेत. ही समस्या सोडवण्यासाठी चांगला उपाय हाच की, शक्य होईल तोवर नागरिकांनी ऊर्जेचा अधिक वापर टाळावा. सार्वजनिक वाहनांचा वापर करावा, दक्षिण कोरियात सिस्कोने काही प्रयोग केले. त्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी झाले आणि वाहतूकही सुरळीत झाली. भारतातील वाढत्या लोकसंख्येसाठी शहराचा आराखडा तयार केला पाहिजे. स्मार्ट प्लॅनिंग आणि तंत्रज्ञानाने लक्ष्य निश्चित केले पाहिजे. स्वातंत्र्यानंतर चंदिगड आणि गांधीनगर या दोनच शहरांची निर्मिती भारताने केली आहे. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरच्या (डीएमआयसी) माध्यमातून देशाचा आर्थिक चेहरा बदलणार आहे.
90 अब्ज डॉलरची ही जगातील सर्वात मोठी पायाभूत योजना आहे. या योजनेत 24 नवीन शहरांची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे 18 कोटी जनतेला अधिक चांगले जीवन मिळेल. जगातील सर्वाधिक चांगले ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रेड सेंटर येथे असणार आहे. या कॉरिडोरमुळे दिल्ली-मुंबईदरम्यान माल फक्त एका दिवसात पाठवता येईल. सध्या यासाठी 14 दिवस लागतात. 2022 पर्यंत देशाच्या उत्पादन क्षेत्रात 15 वरून 25 टक्के वाढ या कॉरिडोरमुळे होईल. देशातील उत्पादन क्षेत्रात 10 कोटी नवीन नोकया निर्माण होतील. हे फक्त उदाहरण दिले आहे. दूरदृष्टी आणि चांगल्या नेतृत्वामुळे समाजाचा कसा विकास करता येईल, हे यातून दिसून येते. भारतात अशी अजून उदाहरणे निर्माण होण्याची गरज आहे. शहरीकरणात भारत जगातील महत्त्वाचे केंद्र होईल. यासाठी नियोजन आणि तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे.