आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील 30 कोटी लोकांना मिळतोय राष्‍ट्रीय आरोग्य विमा योजनेचा लाभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिप रिप्लेसमेंट, कार्डिक बायपास आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी संपूर्ण जगातील व्यक्ती भारतात येत आहेत. चेन्नई, मुंबई आणि दिल्लीतील मोठमोठ्या रुग्णालयांमध्ये विदेशातून येणा-या शेकडो व्यक्तींवर यशस्वी उपचार होत आहेत. भारतीय डॉक्टरांचे नैपुण्य व रुग्णालयांच्या कमी खर्चामुळे विदेशी व्यक्ती उपचारांसाठी भारताला प्राधान्य देत आहेत. विदेशी रुग्णांवर चांगले व स्वस्त उपचार करण्यात आपले वैद्यकीय क्षेत्र यशस्वी राहिले.
भारतीय वैद्यकीय क्षेत्रापुढे अनेक आव्हाने अजूनही आहेत. भारतात बालमृत्यूचे प्रमाण चीन, श्रीलंका व थायलंडसारख्या देशांपेक्षा तीन ते चार पटीने जास्त आहे. पाच वर्षांपेक्षा कमी वयाची 42 टक्के बालके कुपोषित आहेत. याशिवाय इतर समस्यादेखील आहेत. त्यानंतर अनेक सकारात्मक बाबीदेखील आहेत. सन 2005मध्ये ‘नॅशनल रुरल हेल्थ मिशन’मुळे अनेक राज्यांमध्ये मातृत्व आणि बालस्वास्थ्य सेवांमध्ये सुधारणा झाल्या आहेत. तसेच ‘जननी सुरक्षा योजने’त गरीब गर्भवती महिलांची रुग्णालयात प्रसूती होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. ही योजनाही चांगलीच यशस्वी झाली आहे.
‘जननी
सुरक्षा योजना’ हा जगातील सर्वात मोठा ‘कंडिशनल कॅश ट्रान्सफर’ प्रोग्राम आहे. 10 लाख ग्रामीण ‘महिला सामाजिक स्वास्थ्य कार्यकर्ता’ म्हणून या योजनेत सहभागी झाल्या आहेत. ‘राष्‍ट्रीय स्वास्थ्य विमा योजना’ एक राष्‍ट्रीय स्वास्थ्य कार्यक्रम आहे. या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील कामगार आणि संवेदनशील समूहाच्या लोकांची मदत केली जाते. 30 कोटी व्यक्तींना त्याचा फायदा झाला आहे. तामिळनाडूत आरोग्यसेवा दर्जेदार आहेत. तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे कामही उल्लेखनीय आहे. तसेच सन 2017पर्यंत जीडीपीच्या 1.87 टक्के खर्च करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सार्वजनिक क्षेत्राच्या माध्यमातून भारतीय आरोग्यसेवा कार्यरत आहे; परंतु खासगी क्षेत्रातही सन 1980नंतर आरोग्य सुविधांमध्ये लक्षणीय बदल झाले आहेत. आज खासगी सेवा रुग्णांसाठी मोठा आधार झाला आहे.
सर्वसामान्यांपर्यंत जलद आरोग्यसेवा पोहोचण्यासाठी इनोव्हेशनची गरज आहे. ‘अरविंद आय केअर मॉडेल’ त्याचे चांगले उदाहरण आहे. अरविंद केअरचे म्हणणे आहे की, गरिबांवर कमी खर्चात उपचार करून त्याचा खर्च श्रीमंत रुग्णांकडून वसूल करता आला पाहिजे. माहिती-तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे आम्ही हेल्थ सर्व्हिस डिलिव्हरी आणि मॉनिटरिंगमध्ये अनेक इनोव्हेशन आणू शकतो. पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाने टॅब्लेटचा उपयोग करून ‘आरोग्य पाटी’ सुरू केली आहे. ग्रामीण आरोग्य केंद्रे आणि कम्युनिटी हेल्थ सेंटर्स विशेष रुग्णांचा डाटा सेंट्रल सर्व्हरवर टाकू शकतात. त्याच्या आधारे रुग्णांवर दुस-या शहरातील तज्ज्ञ डॉक्टरही उपचार व मार्गदर्शन करू शकतात.