आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kanpur\'s Best Khaja In Khulatabad Fare, Jar Jari Jar Baksh Urus In Marathwada

खुलताबादच्या जर जरी जर बक्ष यांच्या उरुसाची चाचा-भतिजाच्या \'खाजा\'ने वाढवली लज्जत!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद येथील हजरत मुन्तजबोद्दिन ऊर्फ जर जरी जर बक्ष यांच्या उरुसाला 725 वर्षांची परंपरा लाभली आहे. या उरुसाला राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविणारा आणि हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक मानले जाते. तसेच मराठवाड्यातील सर्वात मोठा उरूस म्हणूनही ओळखला जातो. मैदा, तूप, साखर यापासून बनविलेला चविष्ट 'खाजा'च्या प्रसादाचे विशेष महत्व आहे.

उरुसानिमित्त स्थानिकांसह उत्तर प्रदेशातील कानपूरमधील प्रसिद्ध खाजाची दुकाने येथे थाटतात. उरुस सुरु होण्यापूर्वीच उत्तर प्रदेशातील खाजा विक्रेते खुलताबादेत दाखल होतात आणि उरुस संपेपर्यत येथेच मुक्काम करतात. उरुसादरम्यान खाजा विक्रीत लाखों रुपयांची उलाढाल होत असल्याचे कानपूर येथून आलेले एकता खजला भांडारचे चाचा-भतिजा यांनी सांगितले.

खुलताबादच्या उरुसाचा ईद-ए-मिलादच्या दिवशी उत्साहात समारोप झाला. राज्यासह परराज्यातून हजारो भाविक खुलताबादेत येतात. दर्गाहमध्ये जाण्याअगोदर भाविक फुलांची चादर घेतात. तसेच नवस फेडण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात खाजा खरेदी करतात. लहान मुलांची खाजा तुला करण्‍यात येते.

उरुसादरम्यान परिसरात खाजा विक्रीची सुमारे शंभर पेक्षा अधिक दुकाने थाटली जातात. उरुसासाठी मराठवाड्यासह विदर्भ व नाशिक-मालेगाव परिसरातून येथे मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. त्यामुळे खाजाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. भाविक दैनंदिन ताण क्षणभर विसरून येथील खाजासह अन्य लज्जतदार पक्वानांवर ताव मारतात.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, खाजा हे एक मिष्ठान्न...