आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेत डिझाइन, सेंटेड शूजची निर्मिती स्पेनमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करण विज, देशात पहिला सेंटेड शू ब्रँड लाँच
करण यांचे वडील देशातील प्रसिद्ध निर्यातदार आहेत. आपल्या वाटले असते तर वडिलांच्या व्यवसायात गुंतलो असतो, परंतु कष्टातून स्वत:चे स्थान निर्माण करण्याची त्यांनी शिकवण दिली होती. अमेरिकेत उच्चशिक्षण झाले. तिथे फॉर्मल शूज आणि स्पोर्ट््स शूजव्यतिरिक्त अन्य एक श्रेणी आहे-कॅज्युअल शूज. आपल्या देशात याचा वापर होत नाही. विदेशात मुले-मुली मॉल्स, घरात, मित्रांसोबत रंगीबेरंगी कॉटनचे शूज घालतात. स्टाइलबरोबर ते आरामदायी असतात. भारतात परतल्यानंतर काही काळ वडिलांच्या कंपनीत मार्केटिंग कन्सल्टंट म्हणून काम केले. यादरम्यान स्पेन, इटली, युरोप फिरण्याची संधी मिळाली.

या काळात बुटांच्या अनेक कारखान्यांना भेट दिली. शूज डिझायनर्ससोबत ट्रेंड्सवर चर्चा केली. हे सेंद्रिय कापसापासून बनवलेले इको-फ्रेंडली बूट आहेत. स्मार्टफोनपेक्षाही हलके आहेत. खिशात किंवा फोल्ड करून ते कुठेही ठेवता येतात. यादरम्यान देशात सेंटेड बुटांचा कोणता ब्रँड नसल्याचे लक्षात आले. मोजे न घालता दिवसभर बूट घातल्यामुळे पायाला दुर्गंधी येते. थोड्याशा अभ्यासानंतर विदेशातील विदेशी सेंटेड शूज ब्रँड समजून घेतला आणि गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये एक कोटीच्या गुंतवणुकीतून सेंट्रा ब्रँड लाँच करण्यात आला. बुटाचे वैशिष्ट्य असे की, सेंटचा सोलमध्ये शिडकावा केला नाही, तर ते सोलमध्येच डाय करण्यात आले आहे. यामुळे सेंट दीर्घकाळापर्यंत राहतो. ही नवी संकल्पना होती. बुटाचे डिझाइन कॅलिफोर्नियात आणि उत्पादन स्पेनमध्ये केल्यानंतर भारतात आयात केले जातात. आतापर्यंत १३०० बुटांची विक्री झाली आहे. दररोज १०० बूट विक्री करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. पुरुषांना त्यांच्या ब्रँडमध्ये जास्त रस आहे. अलिया भट्ट, अनुपम खेर, सोफी चौधरी त्यांचे क्लायंट आहेत.

जन्म: ४ मार्च १९९० (२४ वर्षे)
कुटुंब: वडील- सुनील विज, व्यावसायिक, आई-संध्या विज, गृहिणी, लहान भाऊ-सिद्धार्थ (शाळेत जातो).
शिक्षण: कॅलिफोर्नियात आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र,नवी दिल्लीतील जी.डी.गोयंका वर्ल्डमध्ये शालेय शिक्षण.चर्चेत- नुकतेच त्यांनी स्प्रिंग समर कलेक्शन लाँच केले.