Home | Divya Marathi Special | kareena kapoor provode solar kandil

विणकरांना मिळणार करिनाचा सौर कंदील

मृदुल जैन (मध्य प्रदेश) | Update - Jun 03, 2011, 06:25 PM IST

चंदेरी साडीसाठी प्रसिद्ध असलेल्या मध्य प्रदेशच्या प्राणपूर चंदेरी गावातले विणकर गेल्या कित्येक दिवसांपासून वीजकपातीचा सामना करत आहेत.

 • kareena kapoor provode solar kandil

  चंदेरी साडीसाठी प्रसिद्ध असलेल्या मध्य प्रदेशच्या प्राणपूर चंदेरी गावातले विणकर गेल्या कित्येक दिवसांपासून वीजकपातीचा सामना करत आहेत. अंधारातच रॉकेलच्या कंदिलाच्या काळ्या धुरात त्यांना सूत विणावे लागते. पण आता अभिनेत्री करिना कपूर या विणकरांच्या मदतीला धावून आली आहे. या विणकरांसाठी तिने सौर कंदिलांची व्यवस्था केली आहे. दीड वर्षापूर्वी 'थ्री इडियट्स'च्या प्रमोशनसाठी करिना आमिरसोबत या गावात आली होती. त्या वेळी तिने येथील विणकरांना धूर आणि अंधाराच्या समस्येतून मुक्त करण्याचे आश्वासन दिले होते.

  कंदील कमी, अपेक्षा जास्त
  प्राणपूरमध्ये सध्या अडीचशे विणकर कुटुंबे राहतात. करिनाने द एनर्जी अँड रिसोर्स इंन्स्टिट्यूटला अडीच लाख रुपये दिले आहेत. ज्याद्वारे फक्त ५ सौर कंदील आणि चार्जिंग स्टेशन बनू शकतात. त्यामुळे इतर विणकरांना करिनाच्या मदतीची अपेक्षा आहे. या समस्या सोडवण्याची जबाबदारी प्राणपूरच्या एका संस्थेला देण्यात आली आहे. ही संस्था विणकरांना ३ रुपयांच्या डिपॉझिटवर २ रुपये प्रति दिवस याप्रमाणे कंदील भाड्याने देणार आहे.

  चिमणीच्या धुरातून सुटका
  आतापर्यंत वीजकपातीदरम्यान साडी विणण्याकरिता विणकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आता सौर कंदिलांमुळे चिमणीच्या धुरातून त्यांची सुटका होणार आहे.
  गोपाळ कोळी, प्राणपूर साख स्वाया सहकारी संस्था, प्राणपूर

Trending